घरमहाराष्ट्रनाशिकउमेदवारीवरुन भाजपमध्ये रंगले पोस्टर वॉर

उमेदवारीवरुन भाजपमध्ये रंगले पोस्टर वॉर

Subscribe

नाशिक पश्चिममध्ये ‘आम्हणं पक्क शे!’; मध्य मतदारसंघात ‘स्मार्ट कार्ड’ची चलती

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भाजप, शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरु असले तरी दुसर्‍या बाजूला भाजपमध्येच उमेदवारी मिळवण्यावरुन पोस्टर वॉर सुरु झाले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सिमा हिरे यांच्या जागेवर भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या समर्थकांनी ‘आम्हणं पक्क शे’! असे अहिराणी भाषेतील फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच मध्य मतदारसंघात स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके यांनी एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’चे वितरण केंद्र सुरु करुन आपली महत्वकांक्षा स्पष्ट केली आहे.

केंद्रासह राज्यात एकहाती सत्ता मिळवल्यामुळे भाजप, सेना युतीचा विश्वास दुनावला आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांना गळाला लावून युतीने आपले मनसुबे पुन्हा एकदा सिध्द केले असताना शहरात पुन्हा गटबाजीचे पीक उफाळून आले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांच्या नावाने ‘आमचं ठरलयं’, ‘आम्हणं पक्क शे’ असा स्वरुपाचे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे या फलकांवर पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह राज्यातील मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष पालवे या सर्वांचे फोटो आहेत. परंतु, आमदारांचे फोटो नसल्यामुळे या विधानसभेच्या दिशेनी फेकलेला तीर असल्याचे दिसून येते. सिडकोतील महत्वाच्या चौकात हे फलक झळकत असल्यामुळे त्याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. आमदार सीमा हिरे यांचा पत्ता कट होणार का? या भितीपोटी काही अज्ञात व्यक्तींनी हे फलक फाडून टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे गटबाजीला गालबोट लावल्याचे दिसून येते. शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये या पध्दतीने फलकबाजी करुन उमेदवारी मिळवण्याचे प्रकार आता सुरु झाले की काय? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडू लागला आहे.

- Advertisement -

नाशिक मध्य या सर्व समावेशक मतदारसंघात महापालिकेच्या स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याविषयी गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कल येथे फलक झळकावून त्यांनीही विधानसभेची पायाभरणी सुरु केलेली दिसते. अर्थात, त्यांनी फलकावर पक्षातील ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांचे फोटो लावून कोणाचाही विरोध पत्करलेला नाही. त्यामुळे पक्ष वाढीसाठी काम करत असल्याचे भासवून त्यांनी आपले राजकीय मनसुबे निश्चित केल्याचे दिसून येते.

पोस्टर वॉर का?

शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे दिले जातात. त्यामुळे पक्षहिता विरोधात कारवाई करणारे या पक्षात सुतासारखे सरळ होत असल्याचे बोलले जात होते. मात्र, सत्तेचा मोह प्रत्येकाला होतो, त्याप्रमाणे भाजपमधील काही नेत्यांनाही हा मोह आवरता आलेला नाही, असेच ‘आम्हणं पक्क शे’ या फलकावरुन दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -