घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील २५० भिकार्‍यांचे पुनर्वसन

शहरातील २५० भिकार्‍यांचे पुनर्वसन

Subscribe

शहर पोलीस, महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक संस्था, महानगरपालिका यांच्यातर्फे हे सर्व्हेक्षण करत शहरातील २५० भिकार्‍यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

धार्मिक स्थळे, रस्ता, फूटपाथ आदी ठिकाणी भीक मागणार्‍याचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. शहर पोलीस, महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक संस्था, महानगरपालिका यांच्यातर्फे हे सर्व्हेक्षण करत शहरातील २५० भिकार्‍यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

नांगरे-पाटील म्हणाले, शहरात भिकार्‍यांची संख्या किती आहे, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले. अनेक भिकार्‍यांची स्वत:ची घरे व जमिनी असल्याचे आढळून आले आहे. तरीही ते शहरात मुलांसह भीक मागत असल्याचे आढळून आले. महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक संस्था, महानगरपालिका यांच्यातर्फे शहरात भिकार्‍यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या माध्यमातून २५० भिकार्‍यांचे पुनर्वसन करण्यात आले. २०१८ मध्ये शहरातील १२६ भिकार्‍यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. एप्रिल २०१९ पर्यंत २० भिकार्‍यांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी अहमदनगर, मालेगाव व पुणे येथे शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -