घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-अहमदाबाद, हैदराबाद विमानसेवेला दुसर्‍या दिवशीही प्रवाशांचा प्रतिसाद

नाशिक-अहमदाबाद, हैदराबाद विमानसेवेला दुसर्‍या दिवशीही प्रवाशांचा प्रतिसाद

Subscribe

हैदराबाद, अहमदाबादसाठी आज ७७ प्रवाशांचे उड्डाण, गोव्यासाठीही लवकरच सेवा

नाशिक-अहमदाबाद, हैदराबाद विमानसेवेसाठी आज दुसर्‍या दिवशीही प्रवाशांचा प्रतिसाद लाभला. शनिवारी, २ फेब्रुवारीस म्हणजेच दुसर्‍या दिवशी अहमदाबादसाठी ३३ तर हैदराबादसाठी ४४ प्रवाशांंनी नाशिकहून प्रवास केला. सेवेला पहिल्याच दिवसापासून नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, सोमवारपासून ओझर विमानतळावरदेखील बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गेल्या वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर नाशिक हे अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन शहरांशी जोडले गेले आहे. दिल्लीवगळता नाशिकहून मुंबई वा इतर शहरांसाठी विमानसेवेचा अनुभव अद्यापपर्यंत फारसा चांगला राहिलेला नाही. उडाणच्या दुसर्‍या टप्प्यात सहा मोठ्या शहरांसासाठी सेवा देण्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर शुक्रवारपासून या सेवेला मुहूर्त लाभला. एअर अलायन्स या कंपनीद्वारे नाशिक-अहमदाबाद आणि नाशिक-हैदराबादसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या दिवशीच सुमारे १२५ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. आज शनिवारी दुसर्‍या दिवशीही नाशिकहून अहमदाबादसाठी ३३, तर हैदराबादसाठी ४४ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. अहमदाबादहून नाशिकला ४५ प्रवासी तर हैदराबादहून २० प्रवासी नाशिकला आले. या विमानसेवेबाबत लवकरच नाशिकच्या विविध संस्था संघटनांशी संपर्क साधला जाईल. तसेच, या सेवेचे ब्रॅण्डिंग करून पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असे अलायन्स एअरच्या वतीने सांगण्यात आले. अहमदाबादची सेवा पुढे कांडलापर्यंत नेली जाईल असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

गोव्यासाठीही लवकरच सेवा

नाशिकची विमानसेवा विस्तारत असून उडाण योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात नाशिकहून गोवा आणि हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा देण्यासाठी स्पाइस जेट या कंपनीची निवड झाली आहे. गोवा येथे रात्रीचा स्लॉट उपलब्ध झाला आहे. ओझर विमानतळावर नाइट लॅण्डिंगची सुविधा आहे. यासंदर्भात विमान वाहतूक महासंचालनालयाचे पथक नाशिकमध्ये येऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर साधारणत: महिनाभरात ही सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -