घरमहाराष्ट्रनाशिकमहाराष्ट्रात परराज्यातून गुटख्याची वाहतूक

महाराष्ट्रात परराज्यातून गुटख्याची वाहतूक

Subscribe

आमदार योगेश घोलपांच्या प्रश्नावर मंत्री रावल यांची कबुली

गुटखाविक्रीला हप्तेखोरीचे ‘व्यसन’ या मथळ्याखाली दैनिक आपलं महानगरने सोमवारी (ता. २४) ‘नजर महागरची’ सदरात सविस्तर वृत्तांकन केले. या वृत्ताच्या अनुषंगाने आमदार योगेश घोलप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात गुटखा विक्रीस प्रतिबंध असला, तरी परराज्यातून चोरट्या व छुप्या मार्गाने वाहनांमध्ये लपवून गुटख्याची वाहतूक केली जात आहे, अशी कबुली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे ‘आपलं महानगर’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. बागलाण तालुक्यातून ४ लाख ३२ हजार रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आल्याचीही माहिती यावेळी रावल यांनी दिली.

गुटखा विक्रीत नाशिकमधील अनेक बडे व्यापारी सामील आहेत. त्यांना बाहेरच्याही शहरातील काही वितरक हवालामार्फत पैसे पाठवतात. तेथून गुजरातमधून गुटखा नाशिकमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. गुजरातमधील दोन बड्या वाहतूकदारांकडून नाशिकसह अन्य शहरांत कंटेनरने गुटखा विक्रीसाठी पाठवला जातो. नाशिक शहरात रोज दोन ते तीन कंटेनरमधून गुटखा विक्रीसाठी पाठवला जातो. एका कंटनेरमधून साधारणपणे पन्नास लाखांचा माल विक्रीसाठी पाठवला जातो. परराज्यातून गुटखा आणतानाच महामार्गावरील दुकानांमध्ये गुटखा पुरवून तो किरकोळ विक्रेत्यांना विकला जातो.

- Advertisement -

गुटखाविक्रीला हप्तेखोरीचे ‘व्यसन’ या सविस्तर वृत्ताची चर्चा दिवसभर शहरासह जिल्ह्यात सुरू होती. या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश घोलप यांनी सोमवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला. गुटखा विक्रीतील दोषींवर कारवाई करत गुटखा वाहतुकीस प्रतिबंध करण्याबाबत राज्य शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, असा प्रश्न आमदार योगेश यांनी उपस्थित केला. त्यास जयकुमार रावल यांनी उत्तर दिले. प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच अन्न व औषध प्रशासन व पोलिसांकडून गुटखा, तबाखूजन्य पदार्थ जप्त करत कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत चोरट्या व्यापारास आळा बसावा, यासाठी विभागात ज्या ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळला ती जागा अथवा वाहन जप्त केले जाते. प्रतिबंधित अन्नपदार्थ बाळगणार्‍या व्यक्तिंविरुद्ध कलम ३२८ नुसार कारवाई केली जाते, असे रावल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -