घरदेश-विदेशरुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आढळली घोरपड

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आढळली घोरपड

Subscribe

सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये तीन फुटाची घोरपड आढळून आल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

हरयाणातील फतेहाबादमध्ये असलेल्या एका सरकारी रुग्णालयात तीन फुटांची घोरपड आढळून आली आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ही घोरपड आढळून आल्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. ही घोरपड तीन फुटांची असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

तीन फुटाची घोरपड

हरयाणातील फतेहाबादमधील तोहाणा या ठिकाणी असलेल्या सरकारी रुग्णालयात तीन फूट लांबीची घोरपड आढळून आली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या घोरपडीला पकडून नंतर तिला जंगलात सोडण्यात आले आहे. तसेच एएनआय या वृत्तसंस्थेने फोटो देखील पोस्ट केले आहेत. घोरपड रुग्णालयात आल्याचे कळताच रुग्णांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, त्या घोरपडीला जंगलात सोडल्याचे समजताच रुग्णांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, ही घोरपड रुग्णालयात आली कुठून याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


हेही वाचा – रिकामी गावे, मरणासन्न मुके प्राणी

- Advertisement -

हेही वाचा – राणीबागेत आजपासून बघायला मिळणार ‘हे’ प्राणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -