घरताज्या घडामोडीप्रसिद्ध तबलावादक नवीन तांबट यांचे निधन

प्रसिद्ध तबलावादक नवीन तांबट यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ तबलावादक, पेठे हायस्कूलचे निवृत्त कलाशिक्षक नवीन तांबट (वय ७०) यांचे गुरुवारी (दि.४) सकाळी ८ वाजेदरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा तांबट, मुलगी गीतांजली, मुलगा निनाद, सून आणि पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

तांबट यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर उपचारासाठी ते कोव्हीड सेंटरमध्ये दाखल झाले. तिथे त्यांना बरे वाटत नसल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालवत गेल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. तांबट यांचे शिक्षण रुंग्ट महाविद्यालयात झाले. ते जून १९७० मध्ये शिक्षण म्हणून पेठे महाविद्यालयात रूजू झाले. पेठे विद्यालय सांस्कृतिक केंद्र असल्याने लोखितवादी मंडळाचे कार्यक्रम व सराव शाळेत होत. तात्यासाहेब शिरवाडकर व वसंतराव कानेटकर त्यावेळी उपस्थित राहत. या कार्यक्रमात नवीन तांबट सहभागी व्हायचे. तांबट हे उत्कृष्ट तबला, कोंगो, नालवादक होते. सार्वजनिक कार्यक्रमात ते नेहमी सहभागी होत. त्यांनी अनेक दिग्गज कलावंतांना साथ संगत केली होती त्यात प्रामुख्याने हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार अनिल मोहिले, संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या अनेक कार्यक्रमात तांबट यांनी तबल्यावर साथसंगत केले. त्यांचा स्वरदा सुगम संगीत वर्ग होता. त्या माध्यामातून ते नवोदिता गायकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -