घरमहाराष्ट्रनाशिकपतीला शोधणाऱ्या सुनेच्या डोक्यात मुसळ

पतीला शोधणाऱ्या सुनेच्या डोक्यात मुसळ

Subscribe

नाशिकरोड भागात पतीच्या शोधात सासरच्या घरी गेलेल्या विवाहितेच्या डोक्यात सासुने लोखंडी मुसळ मारल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत संबंधित विवाहिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसे येथील कारखानारोडवर सोमय्या नगर येथे राहणारी प्रियंका प्रवीण गायकवाड (२८) हिने तिचा पती प्रवीण याला फोनद्वारे संपर्काचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीण फोन उचलत नसल्याने, त्रस्त झालेली प्रियंका नवऱ्याचा शोध घेत जवळच राहणाऱ्या सासूच्या घरी गेली. पतीबाबत विचारताच सासू मथुरा गायकवाड, दीर कैलास गायकवाड आणइ जाऊ सुजाता गायकवाड यांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली, सासूने घरातील लोखंडी मुसळ प्रियंकाच्या डोक्यात मारल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी सासू, दीर व जा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -