घरमहाराष्ट्रगिरीश महाजनांकडून अण्णांच्या मनधरणीचा प्रयत्न

गिरीश महाजनांकडून अण्णांच्या मनधरणीचा प्रयत्न

Subscribe

गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे उपोषणासंदर्भात नेमकी काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

देशात लोकायुक्त आणि लोकपाल व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सरकारकडून अण्णांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे राळेगण सिध्दीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी अण्णा हजारे यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. ‘आम्हाला अण्णांच्या प्रकृतीची काळजी आहे. अण्णांनी आपली तब्बेत जपली पाहिजे. अण्णांच्या महत्वाच्या मागण्या आम्ही मान्य केले आहेत. अर्थसंकल्पामध्ये अण्णांच्या ७० ते ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत त्यामुळे अण्णांनी उपोषण मागे घ्यावे’, अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली आहे. ‘कोणीही राजकीय बाजू घेण्याचा प्रयत्न करु नये’, असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे उपोषणासंदर्भात नेमकी काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३० जानेवारीपासून अण्णा हजारे राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अण्णांच्या यकृतामध्ये संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढचे २४ तास चिंतेचे आहेत. अण्णांची तब्बेत ढासळली असून त्यांचे वजन ३.५ किलोने कमी झाले आहे. जर अण्णांची तब्बेत आणखी बिघडली तर त्यांना ताबडतोबत रुग्णालयात दाखल करावे लागेल असे सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. अण्णांची प्रकृतीत बिघाड होत असताना आज सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. अण्णांनी तब्बेतीची काळजी घ्यावी आणि आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

अण्णांच्या जीवाशी खेळू नका – उध्दव ठाकरे

- Advertisement -

अण्णा हजारेंनी नवाब मलिक यांना बजावली नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -