घरमहाराष्ट्रनाशिकस्वारबाबानगर येथे दोन दुचाकींना आग

स्वारबाबानगर येथे दोन दुचाकींना आग

Subscribe

सातपूरच्या स्वारबाबानगर येथील कामगार मजुरांच्या वसाहतीत गुरुवारी ११ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सातपूरच्या स्वारबाबानगर येथील कामगार मजुरांच्या वसाहतीत गुरुवारी ११ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत शेजारीच पार्क केलेल्या अन्य एका दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

स्वारबाबानगरातील कालिका चौक येथील रहिवासी ज्ञानेश्वर लक्ष्मण वानखेडे मनपाचे पेंटिंग ठेकेदार असून तो आई, वडील, भाऊ दीपक यांच्या बरोबर एकत्र कुटुंबाचे अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री अकराला हिरो होंडा स्पे्लंडर (एम एच १५ ई सी ३८१६) कालिका चौकात सार्वजनिक ठिकाणी पार्क करून घरी गेले. मध्यरात्रीनंतर २.३०च्या सुमारास चौकात काही तरी आवाज आल्याने धांवत ते धावत गेले असता त्यांची व शेजारी सुभाष मुरलीधर रणशेवरे यांची अक्टिव्हा फाईव्ह जी (क्र.एमएच १५ जी एम ५२१९) पेटलेल्या होत्या. दोन्ही दुचाकीची आग विझवण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश राऊतसह काही जागरूक प्रयत्न केले. दरम्यान या परिसरात नेहमीच अशा प्रकारच्या घटना घडतात. तक्रार देऊनही पोलीस केवळ तपास सुरू असल्याचे उत्तर देतात, असे नीलेश राऊत यांनी सांगितले. दत्ता गडकर यांनी सातपूर पोलिसांत तक्रार दिली आहे. हवालदार ए.आर.सोसे तपास करीत आहेत. दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगर येथेही तीन दिवसांपूर्वी चारचाकी कार पेटवून दिल्याने या आगीत कार पूर्णपणे खाक झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -