घरमहाराष्ट्रनाशिकदुचाकी चोरीचे १४ गुन्हे; सराईत गुन्हेगार जाळ्यात

दुचाकी चोरीचे १४ गुन्हे; सराईत गुन्हेगार जाळ्यात

Subscribe

गंगापूर पोलिसांची सापळा रचून केली अटक, साथीदार फरार

नाशिक शहर व उपनगरातून दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केले. पोलिसांनी त्याला पकडताच त्याचे दोन साथीदार फरार झाले. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (ता.२५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातपूर परिसरात केली. त्याच्यावर शहरातील १३ पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १४ दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.

अक्षय प्रदीप कुरकरे (रा. जय जगदंबे माँ रो-हाऊस क्रमांक ३, शिवाजीनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दीपक पालवे व अशोक (पूर्ण नाव उपलब्ध नाही) (दोघेही रा.प्रबुद्धनगर, सातपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुशांत विभूती कर (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी गोदावरी अपार्टमेंट, गंगापूर शिवार येथे दुचाकी (एमएच १५, बीएस २८५९) पार्क केली. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. याप्रकरणी कर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी लंपास झाल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी समांतर तपास सुरु केला. तपासात पोलिसांना अक्षय, दीपक व अशोकने सुशांत कर यांची दुचाकी लंपास केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अक्षयला सापळा रचून अटक केले. त्यावेळी त्याचे दोन साथीदार दीपक व अशोक फरार झाले. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पी. जी. भूमकर करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -