घरमहाराष्ट्रनाशिकशांतीगिरीजी महाराजांचा आशीर्वाद नेमका कुणाला?

शांतीगिरीजी महाराजांचा आशीर्वाद नेमका कुणाला?

Subscribe

गोडसे, भुजबळांनी केला पाठिंब्यांचा दावा; औरंगाबादमध्ये मात्र अपक्षाला पाठिंबा

संत जनार्दन स्वामींचे शिष्य शांतीगिरी महाराजांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ या दोघांनाही आशीर्वाद दिल्याने बाबाजींचा आशीर्वाद नेमका कुणाला याविषयी साशंकताच आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी बाबाजींनी आपल्यालाच पाठिंबा दर्शविल्याचे जाहीर केल्याने भक्त परिवारात यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

शांतीगिरी महाराज यांचा औरंगाबाद आणि नाशिकमध्ये मोठा भक्त परिवार आहे. नाशिकमध्ये जवळपास दीड लाखांच्या आसपास त्यांचे अनुयायी आहेत. तर, उत्तर महाराष्ट्रातही जय बाबाजी भक्त परिवार मोठा आहे. त्यामुळे बाबाजींचे आर्शिवाद घेण्यासाठी ओझर येथील त्यांच्या आश्रमात उमेदवार हजेरी लावत असल्याचे दिसून येते. नुकतीच राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेत त्यांना नाशिकच्या विकासाबाबत प्रगतीपर्व पुस्तिका भेट देत त्यांचे आर्शिवादही घेतले. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनीही महाराजांची भेट घेत त्यांचे आर्शिवाद घेतले. यावेळी महाराजांचा पाठींबा गोडसे यांनाच असल्याचे गोडसे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले. राष्ट्रहीताचा संकल्प आणि राजकारणाच्या शुध्दीकरणासाठी मोदींना साथ देण्याची भुमिका जय बाबाजी परिवाराने घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वतः महाराजांनी औरंगाबादमधून उमेदवारी करत शिवसेना-भाजपचे उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणले होते. दीड लाखांच्या आसपास भक्त परिवाराची मते शांतीगिरी महाराजांनी मिळविली होती, त्यामुळे खैरेंचे मताधिक्य घटले. सोबत काँग्रेसच्या उमेदवाराचाही पराभव झाला होता. २०१९ च्या संभाव्य लोकसभा निवडणूक मैदानात भाजपकडून उमेदवारी करणार असल्याची घोषणा शांतीगिरी महाराज यांनी केली होती. भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. नाशिक येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही शांतीगिरी महाराजांची भेट घेतली होती. परंतु हिंदू मतांचे विभाजन नको म्हणून शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही असे सांगितले जाते. नाशिकमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी महाराजांचे आर्शिवाद घेतल्याने महाराजांचा आर्शिवाद नेमका कोणाला याबाबत संशय व्यकत होत आहे.

नाशिक, औरंगाबादमध्ये वेगळी भुमिका

गत निवडणुकीत औरंगाबादमधून सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारया शांतीगिरी महाराजांनी यंदा नाशिकमध्ये मात्र शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठींबा दर्शवल्याचे सांगितले. हा पाठींबा मोदींसाठी दिल्याचे सांगितले जात असले तरी, औरंगाबादमध्ये मात्र त्यांनी खैरे यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिल्याने दोन जिल्हयांमध्ये महाराजांनी वेगवेगळी भुमिका घेतल्याचे दिसून येते यामुळे जय बाबाजी परिवारामध्ये संभ्रमावस्था आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -