घरताज्या घडामोडीकारच्या धडकेत युवतीचा मृत्यू

कारच्या धडकेत युवतीचा मृत्यू

Subscribe

भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता रेडक्रॉस सिग्नल येथे घडली होती. ट्विंकल जगदीश नगरे (२१, सध्या रा.उत्तमरनगर, सिडको, मूळ रा.धुळे) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघातानंतर कारचालकाने उपचारासाठी युवतीस रुग्णालयात दाखल करत पळ काढला. याप्रकरणी सुनील बापूराव जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांच्या माहितीनुसार, ट्विंकल नगरे ही चित्रकला शिक्षणासाठी नाशिकमध्ये मामाकडे आली होती. गुरुवारी (दि.१६) ती रेडक्रॉस सिग्नलवरुन कृष्णा प्ले वर्ल्ड दुकानासमोर पायी जात होती. त्यावेळी रविवार कारंजाकडून शालिमारकडे जाणार्‍या भरधाव कार (एमएच१७एजे७६८४)ने ट्विंकलला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. कारचालकाने तिला उपचारासाठी शालिमार येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करुन पळ काढला. रुग्णालयात उपचार चालू असताना तिचा शुक्रवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -