घरताज्या घडामोडी'नया है वह' शरद पवारांनंतर भुजबळांनी केले पार्थचे वर्णन

‘नया है वह’ शरद पवारांनंतर भुजबळांनी केले पार्थचे वर्णन

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे अपरिपक्व असून त्याच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील पार्थचे वर्णन त्यांच्या शैलीत केले आहे. पार्थची पाठराखण करताना ‘नया है वह’ हा डायलॉग वापरला आहे. भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांनी पार्थबद्दल भाष्य केल्यानंतर मी त्याबाबत अधिक बोलण्याची गरज नाही. पार्थ राजकारणात नवीन आहेत, हिंदीतच सांगायचे झाल्यास ‘नया है वह’ असे भुजबळ म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात CBI चौकशीची मागणी करणारे पत्र पार्थ पवारने गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले होते. याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला असता त्यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, पार्थ पवार यांचे वक्तव्य अपरिपक्व असून त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही.” यावरुन राष्ट्रवादीत एकच गजहब उडाला होता. त्याच दिवशी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती.

- Advertisement -

छगन भुजबळ यांना याविषयी माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “पवार कुटुंबिय एकत्रित आहेत. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सदस्य आहोत. अजित पवार दुखावलेले नाहीत. इतर कुणीही दुखावलेले नसून सगळे एकत्रित आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -