घरमहाराष्ट्र'बाळासाहेब हयात असते तर शहांना लाथ घातली असती'

‘बाळासाहेब हयात असते तर शहांना लाथ घातली असती’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सध्याच्या हालचालींवर सडकून टीका केली आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अमित शहा यांना लाथ घातली असती, असे भुजबळ म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान, महाड येथे सभा घेण्यात आली. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सध्याच्या हालचालींवर सडकून टीका केली. भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले होते. अमित शहा यांनी शिवसेनेला पटक देंगे, असे म्हटले होते. याच मुद्यालाधरुन भूजबळ यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, आज बाळासाहेब हयात असते तर शहांना लाथ घातली असती.

- Advertisement -

मोदी यांची चाय फेल, लग्न फेल, घर फेल, नोटाबंधी फेल आणि राफेल फेल

या सभेमध्ये भूजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी मोदींच्या धोरणांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, मोदी यांची डिग्री फेल, चाय फेल, लग्न फेल, घर फेल, नोटाबंदी फेल आणि आता राफेल फेल. अशा सगळ्याच गोष्टी मोदींच्या फेल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘चोर कोण ते सांगा’

छगन भुजबळ म्हणाले की, ‘युती करा नका करा, पण लोकांना का फसवता? उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणतात. परंतु, नक्की चोर कोण ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे. तुम्ही सत्तेत असून तुमची तेवढीच जबाबदारी आहे. भाजप-शिवसेना यांचे भांडण म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशी अवस्था आहे’. उद्धव ठाकरे म्हणतात सरकार नालायक आहे. तर मग असंगाशी संग का केला? यामुळे लोकं वाण नाहीतर गुण लागला, ढवळ्या शेजारी पवळा बांधला असं बोलतील, असे भुजबळ म्हणाले आहेत.

- Advertisement -

‘वृत्तवाहिन्यांवर दबाव’

सरकार व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचाही आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘आज लिखाणावर स्वातंत्र्य नाही. अनेक वृत्तवाहिन्यांवर दबाव आणला जातो. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या’. नयनतराता सहगल यांनी समस्यांवर बोट ठेवल्यावर त्यांनाही रोखलं, असे भुजबळ म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -