घरमहाराष्ट्रअभ्यासक्रमातून जात वर्ण सांगणारी माहिती वगळावी - छगन भुजबळ

अभ्यासक्रमातून जात वर्ण सांगणारी माहिती वगळावी – छगन भुजबळ

Subscribe

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून आक्षेपित लिखाण लवकरात लवकर वगळण्यात यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून जात वर्ण व्यवस्था शिकवणारी माहिती तातडीने वगळण्यात यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव बी.ए.एम.एस. आणि पदव्युत्तर (एम.एस.प्रसूतीशास्र स्री रोग) अभ्यासक्रमासाठी चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह आदी ग्रंथ शिकविले जातात. त्यातील चरक संहितेत ‘शरीर संख्याशरीरध्यायः, जातीसूत्रीयशरीराध्यायः, गर्भाधान, गर्भ आणि गर्भिणी परिचर्या सूत्रस्थान’ आदी वेगवेगळ्या प्रकारातून पुसंवन विधी, पुत्रकामेष्टी यज्ञ, पुत्रेष्टीयज्ञाचे पुर्वकर्म, मनोवांछित संतती याचे शिक्षण दिले जाते. तसेच शुद्रासाठी इच्छित पुत्रप्राप्ती कशी करावी याचे देखील शिक्षण दिले जाते. हे संविधान आणि त्यातील तरतुदींच्या विरोधात आहे.

यामुळे होतो कायद्याचा भंग

या ग्रंथाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्ती कशी करावी किंवा करून द्यावी हे शिकविले जात असल्यामुळे कायद्याचा भंग होत आहे. सदर अभ्यासक्रमामुळे गर्भधारणापुर्व आणि प्रसूतिपुर्व गर्भधारणा निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायदा १९९४ सुधारित २००३ नुसार गर्भधारणापुर्व प्रसूतिपुर्व कालावधीमध्ये लिंग निदान करणे, सांगणे, प्रोत्साहन देणे इत्यादीने कायद्याचा भंग होत असल्यामुळे या अभ्यासक्रमातून हा भाग वगळला जावा अशी मागणी राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी देखील विद्यापीठाकडे ९ नोव्हेंबर २०१६ च्या पत्राद्वारे केल्याचे भुजबळांनी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र अद्यापही विद्यापीठाने याबाबत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून जात व्यवस्थेचे समर्थन करणारे हे आक्षेपित लिखाण लवकरात लवकर वगळण्यात यावे अशी मागणी भुजबळ यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

वाचा – भुजबळांचा ड्रीम प्रोजेक्ट भाजपने पळवला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -