घरमहाराष्ट्रनितेश राणे आणि काँग्रेस या मुद्द्यासाठी आले एकत्र

नितेश राणे आणि काँग्रेस या मुद्द्यासाठी आले एकत्र

Subscribe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यपदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. नारायण राणे यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी देखील मी मनाने स्वाभिमान पक्षात तर फक्त शरीराने काँग्रेस पक्षात असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर नितेश राणे यांनी अनेक मुद्दयावर काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. मात्र आज नितेश राणे आणि काँग्रेसचे आमदार एकत्र आल्याचे चित्र मुंबईच्या आझाद मैदान येते पाहायला मिळाले.

- Advertisement -

 

मुस्लिमांना आरक्षण मिळावे म्हणून मुस्लिम आराक्षण संघर्ष समितीने माळशिरस ते मुंबई असा ४०० किमी पायी प्रवास करून मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेस आमदार अमीन पटेल, नसीम खान आणि कांग्रेस बरोबर बेबनाव चालू असला तरी सध्या काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले नितेश राणे यांनी एकत्रित भेट देवून मराठा आरक्षण पाठोपाठ मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा दिला.

- Advertisement -

FB Live: काहीही झालं तरी नाणार होऊ देणार नाही! – नितेश राणे

खासदार नारायण राणे हे आघाडी सरकारमध्ये असताना मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देऊ केले होते. तर आघाडी सरकारने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले होते. मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण मिळाले पाहीजे, या मागणीसाठी नितेश राणे यांनी काँग्रेसच्या आमदारांसोबत आझाद मैदान गाठले. राणे आणि काँग्रेसमध्ये बेबनाव असला तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत, असा संदेशच राणे आणि काँग्रेस यांनी यानिमित्ताने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -