घरमहाराष्ट्रई-आवास योजनेतून पोलिसांसाठी घरे

ई-आवास योजनेतून पोलिसांसाठी घरे

Subscribe

पोलिसांना एका क्लिकवर शासकीय निवासस्थाने मिळणार आहेत. निवास्थळे कुठली हवीत याबाबतीत निर्णय घेण्याची मूभा देखील पोलिसांना असणार आहे. आपल्याला हवे ते घर शासनाच्या ई-आवास येजनेमार्फत पोलीस सहज मिळवू शकणार आहेत.

पोलिसांना एका क्लिकवर शासकीय निवासस्थाने मिळणार आहेत. निवास्थळे कुठली हवीत याबाबतीत निर्णय घेण्याची मूभा देखील पोलिसांना असणार आहे. आपल्याला हवे ते घर शासनाच्या ई-आवास येजनेमार्फत पोलीस सहज मिळवू शकणार आहेत. पोलिसांना सोपी आणि सोयिस्कर अशी सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या ई-आवास प्रणालीचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर सांताक्रुझ येथील ४७ नवीन पोलीस निवासस्थानांचे हस्तांतरण देखील यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, अप्पर पोलीस आयुक्त मनोज शर्मा, पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांच्यासह कर्मचारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – रेल्वे पोलिसांचा जीव मुठीत; इमारत केव्हाही कोसळेल!

- Advertisement -

ई-आवास प्रणालीमुळे पारदर्शकता येईल – मुख्यमंत्री

ई-आवास प्रणालीच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रणालीमुळे शासकीय निवासस्थाने मिळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. त्याचबरोबर सांताक्रुझ येथील नव्या इमारतींमुळे पोलिसांना चांगल्या दर्जाची घरे मिळणार आहेत. ही घरांची किंमत तब्बल अडिच कोटी इतकी आहे परंतु सरकारला ही घरे फक्त २५ लाखांत करुन मिळाली आहेत. त्याचबरोबर पोलिसांसाठी बिनव्याजी कर्ज आणि इतर सुविधा पुरविण्यात येत असल्याचेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, पोलिसांमुळे मुंबई सुरक्षित असून, आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले. शिवाय, पोलिसांना मदत करण्यास आपण कधीही तत्पर असल्याचे बच्चन म्हणाले.

हेही वाचा – पोलिस हवालदाराला हवे सहकुटुंब इच्छामरण!

- Advertisement -

अशी होईल निवासस्थानाची निवड

प्रत्येक महिन्यात रिक्त निवासस्थानांची माहिती ई-आवास प्रणालीत प्रसिद्ध होईल. अर्जदार १ ते ९ तारखेपर्यंत आपल्याला पसंतीप्रमाणे ४ निवासस्थानांची नावे देणार आहे. ही नावे १ ते ९ तारखेच्या कालावधी दरम्यान अर्जदाराला हवी तशी बदलता येतील. प्रत्येक महिन्याच्या ३० तारखरेला रिक्त स्थानांची यादी बंद होईल आणि ९ तारखेनंतर पदांनुसार अर्जदारांना निवासस्थानांचे वाटप करण्यात येईल.


हेही वाचा – पोलीस उपनिरीक्षकांची 115 वी तुकडी सज्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -