घरमहाराष्ट्रविधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी घ्या; पुराकडे लक्ष द्या - राज ठाकरे

विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी घ्या; पुराकडे लक्ष द्या – राज ठाकरे

Subscribe

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अभुतपूर्व पुरपरिस्थिती उद्भवली असून पूर ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत करण्यासाठी खूप काही करावे लागणार आहे. लगेच ही परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे, त्याची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागेल. तेव्हा सरकारला कोणतीही मदत करता येणार नाही, त्यांना हात वर करण्याची संधी मिळेल. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी घ्याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी ही मागणी केली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “दोन तीन दिवसांनी पुराचे पाणी ओसरेल. त्यानंतर मात्र पुर आलेल्या भागात रोगराई पसरू शकते. पुर ओसरल्यानंतरही दोन ते तीन महिने जनजीवन सुरळीत व्हायला लागतील. तसेच सप्टेंबरमध्ये आचारसहिंता लागल्यानंतर सरकारला मदत करता येणार नाही. त्यामुळे सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या पाहीजेत.”

- Advertisement -

इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासकीय गहू आणि तांदळाच्या पाकिटावर भाजपची जाहीरात केल्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. मनसेचे कार्यकर्ते पहिल्या दिवसांपासून पुरग्रस्त परिसरात काम करत आहेत. पण त्यांनी कुठेही फोटो लावला नाही. आम्ही जाहीरातबाजी केली नाही. मात्र भाजपचे नेत्यांना सत्तेचा माज आला असल्यामुळे त्यांनी लाज सोडली असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूराच्या पाण्याचा अंदाज आला नाही या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. भाजपच्या लोकांना त्यांचे किती आमदार निवडून येतील याचा अंदाज येतो, मग पुरात किती पाणी भरेल याचा अंदाज कसा येत नाही? असा आरोप ठाकरे यांनी केला. पुरपरिस्थिती गंभीर झाल्यानंतर लगेच लष्काराला पाचारण करण्यात का आले नाही? सरकार कशाची वाट पाहत होते, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -