घरमहाराष्ट्रऐतिहासिक दखनच्या राणीचा वेग वाढणार; इंजीनची चाचणी यशस्वी

ऐतिहासिक दखनच्या राणीचा वेग वाढणार; इंजीनची चाचणी यशस्वी

Subscribe

दखनची राणी अर्थात डेक्कन क्विनला पुश अॅण्ड पुल पद्धतीची चाचणी करण्यात आली असून ही चाचणी यशस्वी झाली असल्यामुळे आता मुंबई ते पुण्याचा प्रवास १ तासांने कमी होणार आहे.

भारतीय रेल्वेची महाराणी असलेली दखनची राणी अर्थात डेक्कन क्विनला पुश अॅण्ड पुल पद्धतीची चाचणी करण्यात आली असून ही चाचणी यशस्वी झाली असल्यामुळे आता मुंबई ते पुण्याचा प्रवास १ तासांने कमी होणार आहे. पूर्वी डेक्कन क्विनला मुंबई ते पुणे जाण्यासाठी तीन तास १५ मिनिट लागायचे. मात्र आता या प्रवासाला फक्त दोन तास ३५ मिनिट लागणार आहेत. त्यामुळे आता डेक्कन क्विनच्या प्रवाशांची वेळेची बचत होणार आहे.

पुश ऍण्ड पुल पद्धतीची यशस्वी चाचणी

मध्य रेल्वेने नुकतेच राजधानी एक्सप्रेसवर ‘पुश ऍण्ड पुल’ पद्धतीची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी ठरल्याने मुंबईतील दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या रंगीन वेळाची बचत झाली आहेत. आता त्याच पाठोपाठ मध्य रेल्वेनी भारताची ऐतिहासिक दखनच्या राणी अर्थात डेक्कन क्विन ट्रेनला या पद्धतीची चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून डेक्कन क्विनची चाचणी सुद्धा यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता मुंबई ते पुण्याच्या प्रवासात आता एका तासाची बचत होणार आहे. मुंबई ते पुणे १९२ किलोमीटरच्या अंतर असून डेक्कन क्विनला हे अंतर कापण्यासाठी तब्बल ३ तास १५ मिनिटाच्या कालावधी लागत होता. कारण या मार्गातील कर्जत येथे घाट सेक्शन असून बँकर जोडणे आणि काढणे यासाठी अतिरिक्त वेळ लागतो. मात्र आता मध्य रेल्वेनी डेक्कन क्विनला पुश-पुल पद्धतीचा वापर करण्याच्या निर्णय घेतला आहे. या चाचणीत मध्य रेल्वे यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता मुंबई ते पुणे डेक्कन क्विनच्या प्रवासात एक तासांची बचत होणार आहे. पुश-पुल पद्धतीमुळे घाट मार्गावर बँकर जोडणे आणि काढणे यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आता कमी होणार आहे.

- Advertisement -

डेक्कन क्विनला ‘पुश अॅण्ड पुल’ या पद्धतीची चाचणी पुणे- लोणावळा घाटात घेण्यात आली होती. ही चाचणीत यशस्वी ठरल्याने मुंबई – पुणे डेक्कन क्विनचा प्रवास आता २ तास ३५ मिनिट होणार असून डेक्कन क्विनच्या प्रवाशांची वेळेची बचत होणार आहेत.  – सुनील उदासी; मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -