घरमहाराष्ट्रराहुल गांधींनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला

राहुल गांधींनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

का दिला राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होत्या. मात्र ते काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसमध्येच राहणार असा खुलासा देखील स्वतः त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी केला होता. मात्र, आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आणि तो राजीनामा स्वीकारल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

अहमदनगरच्या जागेचा तिढा न सुटल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. जागा वाटपात अहमदनगरचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून विखे पाटील कुटुंब काँग्रेसमधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरु झाली होती.


वाचा – नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -