घरमहाराष्ट्रसारस्वत बँकेचे 'व्हॉटसअॅप बॅंकिंग'

सारस्वत बँकेचे ‘व्हॉटसअॅप बॅंकिंग’

Subscribe

आता पर्यंत आपण बँकेचे सर्व अपडेस मोबाईल बँकेद्वारे करत होतो. मात्र आता सारस्वत बँकच्या ग्राहकांकरता सारस्वत बँकेने व्हॉटसअॅप बॅंकिंग सुरु केले आहे. त्यामुळे आता सारस्वत बँकचे ग्राहक व्हॉटसअॅप बॅंकिंगद्वारे सर्व अपडेट पाहणार आहेत.

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं आणि त्यात सर्वात अधिक प्रमाणात वापरण्यात येणारे म्हणजे व्हॉटसअॅप. व्हॉटसअॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात घेऊन आता बँका देखील व्हॉटसअॅपचा अधिक प्रमाणात वापर करत असल्याचे दिसून येत आहे. सारस्वत बँकने नुकतीच ग्राहकांसाठी एक खूशखबर आणली आहे. आता सारस्वत बॅंकेच्या ग्राहकांना एसएमएस ऐवजी व्हॉटसअॅपद्वारे बँकेचे सर्व अपडेट मिळणार आहे. अशा प्रकारची सेवा देणारी सारस्वत बँक ही देशातील दुसरी आणि सहकारातील पहिली बँक ठरली आहे.

व्हॉटसअॅप बॅंकिंग

आता पर्यंत मोबाईल बँकिंग आपण ऐकले होते आणि त्याचा वापर करत होतो. मात्र आता सारस्वत बँकेचे व्हॉटसअॅप बँकिंग सुरु करण्यात आले आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. आता सारस्वत बॅंकेच्या ग्राहकांना एसएमएस ऐवजी व्हॉटसअॅप नोटिफिकेशन मिळू शकणार आहेत. ग्राहक याद्वारे संवाद देखील साधू शकणार आहेत. शिवाय व्हॉटसअॅपवरुन खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट मिळवणे इत्यादी गोष्टी याद्वारे साध्य होणार आहेत. तसेच मोबाईल बँकिंग नोंदणी बँकेच्या इतर उत्पादनांची माहिती विनंती आणि चौकशी अर्ज तसेच अॅप डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. बँकेच्या उत्पादनाच्या माहितीसंदर्भातील सखोल चौकशी, व्याजदर, अर्ज डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी करीत एका क्लिकद्वारे येथून थेट जाण्याची सुविधा देखील बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. ९०२९०५९२७१ या क्रमांकावर मिस कॉल देऊन ग्राहक ‘व्हॉटसअॅप बॅंकिंग सेवा’ यासाठी नोंदणी करु शकतात. ग्राहकांशी थेट संवाद साधणं खूप गरजं असून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरु केलेल्या व्हॉटसअॅप बॅंकिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करता येणार आहे.

- Advertisement -

वाचा – सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये सारस्वत बँक आदर्श


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -