घरमहाराष्ट्रएसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले

एसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले

Subscribe

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसच्या तिकीट दारात कपात केल्याने एसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले आहेत.

एसटी महामंडळाची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावाजलेल्या शिवनेरी बसच्या तिकीट दारात मागील आठवड्यात कपात केल्याने प्रवाशांनी शिवनेरी प्रवासाला पुनश्च: पसंती दिल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या दहा दिवसात तब्बल सहा हजार प्रवाशांची वाढ झाला आहे.

८० ते १२० रुपयांपर्यंत तिकीटाच्या दरात कपात

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसच्या तिकीट दारात एसटीने ८ जुलै पासून तब्बल ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात केली होती. या तिकीट कपातीचे प्रवाशांची चांगलेच स्वागत केले असून गेल्या दहा दिवसात घसरलेली प्रवासी संख्या पुनश्च: वाढण्यास सुरुवात झाली आहे. शिवनेरी बसच्या प्रत्येक फेरीला सरासरी चार प्रवासी वाढल्याचे दिसून येत आहे. रविवार, सोमवार या दिवशी शिवनेरीला चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून येत असून गेल्या दहा दिवसात मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या या बसचे भारमान ४४ टक्क्यावरून ४७ टक्क्यांवर गेले आहे. सध्या कमी गर्दीचा हंगाम असल्याने प्रवासी संख्या अल्प असूनही तिकीट दाराच्या कपातीमुळे शिवनेरीला मिळणारा वाढता प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दादर ते पुणे शिवनेरीचा प्रवास स्वस्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -