घरमहाराष्ट्रपन्नाशीत फादर्स डे; लग्नाच्या २५ वर्षांनंतर झाला ३ मुलांचा बाप!

पन्नाशीत फादर्स डे; लग्नाच्या २५ वर्षांनंतर झाला ३ मुलांचा बाप!

Subscribe

बीड जिल्ह्यातील परळी कावठाळी येथील शेतकरी हरिभाऊ घुले यांना वयाच्या ५० व्या वर्षी संतती प्राप्तीचा लाभ झाला आहे. विशेष म्हणजे 'फादर्स डे' च्या दिवशीच त्यांच्या पत्नीने तीन मुलांना जन्म दिला आहे.

वयाची पन्नाशी, फादर्स डे अन् ३ मुलांचा बाप, असा अनोखा योग नुकताच जुळून आला आहे. परळीतील कावठाळी येथील शेतकरी हरिभाऊ घुले यांना ५० व्यावर्षी बाप होण्याचा योग रविवारी ‘फादर्स डे’च्या दिवशी जुळून आला आहे. विशेष म्हणजे घुले एक मुलाचे नव्हे तर ३ मुलांचे बाप बनले आहेत. लग्न झाल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी त्यांना वडील होण्याचे भाग्य लाभले.

संतती प्राप्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंद देणाऱ्या क्षणांपैकी एक क्षण आहे. वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या बापाला एकाच वेळी एक, दोन नाही कर तीन मुले झाल्याने, त्यांच्या आनंदाचं शब्दात वर्णन करणेही अशक्यच आहे. खेड्यापाड्यात एखाद्याला मूल नसणे, याचे दु:ख त्या जोडप्याला तर असतेच, पण पुरूषापेक्षा बाईला त्याचे मोठे ओझे घेऊन आयुष्यभर जगावे लागते. दारातील नव्हे तर घरातील लोकांचे टोमणे खात तिला दिवस काढवे लागतात. पण घुले यांच्या ३ लोकांचा बाप या गोष्टीत त्यांच्या पहिल्या पत्नीने दाखवलेले शहाणपण वाखणण्याजोगे आहे.

- Advertisement -

जवळपास २५ वर्षांपूर्वी हरिभाऊ यांचा शकुंतला यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर अनेक वर्ष उलटूनही त्यांना मुल होत नव्हते. संतती प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वैधकीय प्रयत्न केले. हे प्रयत्न अपुरे पडत आहेत, हे लक्षात येताच हरिभाऊ यांनी पहिली पत्नी शकुंतला यांनी पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली. फक्त परवानगी देऊन शकंतुला थांबल्या नाहीत, तर स्वत: पुढाकार घेऊन गंगाबाई यांच्याशी घुले यांचेलग्न लावून दिले.

गंमत म्हणजे येथेही गोष्ट सरळ जाणारी नव्हती. लग्नाच्या १० वर्षानंतरही गंगाबाई यांनादेखील मुल झाले नाही.
गंगाबाई यांच्यावर परळीच्या काळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर डॉक्टरांच्या उपचारांना यश आले आणि गंगाबाई यांच्या गर्भात तीळे असल्याचे दोन महिन्यांपूर्वी त्यांना समजले. जिगरबाज गंगाबाई यांनी साडेसात महिन्यानंतर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या आणि १५ दिवसांच्या उपचारानंतर तीन मिनिटांच्या फरकाने त्यांनी तीन मुलांना जन्म दिला. तिन्ही बाळांची प्रकृती उत्तम आहे.

- Advertisement -

गंगाबाई सध्या औरंगपूरला त्यांच्या माहेरी आहेत. घुले यांच्या तिन्ही मुलांना भेटण्यासाठी लोकही गर्दी करत आहेत. एका बाळाची काळजी घेताना गर्दी करत आहेत. एका बाळाची काळजी घेताना दमछाक होते, मात्र गंगाबाई आपल्या तीन बाळांची उत्तम काळजी घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -