घरमहाराष्ट्रएसटीच्या दोन कर्तव्यदक्ष 'सुपरमॉम'

एसटीच्या दोन कर्तव्यदक्ष ‘सुपरमॉम’

Subscribe

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत देत आहेत सेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहे. मात्र त्यांना ने- आण करण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या तिन्ही विभागातून एसटीच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. मात्र, तिन्ही विभागातील अनेक कर्मचारी आदेश देऊनही कर्तव्यांवर हजर झालेले नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नयेत, याकरिता नालासोपारा डेपोतील दोन महिला वाहकांनी पुढाकार घेत गेल्या दोन महिन्यापासून कोरोना योद्धयांना सेवा देत आहेत. या दोन्ही महिला वाहकांना लहान मुलं-मुली असून सुद्धा आपल्या आईच्या कर्तव्योसोबतच आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे नालासोपारा आगारातील या दोन कर्तव्यदक्ष आईंचं सर्वत्र कौतुक होत आहे.

एसटी महामंडळाच्या संकटकाळात एसटीच्या महिला कर्मचारी परिणामांची काळजी न करता धावून आल्या आहे. या आगोदर एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संप झाला होता. या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. मात्र एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर-पुणे एसटीवर काम करुन प्रवाशांना सेवा दिली होती. त्यांच्या या कामाची तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेतली होती. तसंच आज आलेल्या कोरोनाच्या संकटकाळात एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाचे अनेक कर्मचारी गेल्या दोन महिन्यापासून गैरहजर आहेत. त्यांना पत्रव्यहार करून कर्तव्यांवर हजर रहाण्याचे आदेश दिले गेले तरी अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत. परिणामी दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित सुद्धा केलं आहे. मात्र अशा अडचणीत कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, याकरिता नालासोपारा आगारातील महिला कंडक्टर जयश्री कंचकटले आणि किमया कालेकर गेल्या दोन महिन्यांपासून आपले कर्तव्य बजावत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता आधारकार्डच्या सहाय्याने इन्स्टंट पॅन कार्ड काढता येणार!


कर्तव्यांला प्राधान्य

किमया यांना एक चार वर्षाची मुलगी असून घरात वयोवृद्ध सासू- सासरे आहे. घरातील सर्व कामं करून त्या गेल्या दोन महिन्यांपासून आपलं कर्तव्य बजावत आहेत. दैनिक आपलं महानगरशी बोलताना किमया यांनी सागितलं कि, कर्तव्य बजावण्यासाठी त्या जेव्हा घराबाहेर पडतात त्यावेळी त्यांची चार वर्षाची मुलगी त्यांना बिलगते. लेकरू सोडता सोडत नाही. अशावेळी माझ्या मनाची खूप घामलेत होते. एका बाजूला कर्तव्य आणि दुसरीकडे आईची ममता अशा द्विधा मनस्थितीत त्यांना काळजावर दगड ठेवून घराबाहेर पडावं लागतं. कामावरून परत आल्यावर सर्व घरातील कामं आणि स्वयंपाक करून सासू साऱ्यांना औषधं आणि मुलांचा अभ्यास या सर्व गोष्टी कराव्या लागतात. मात्र पती आणि सासू सासऱ्याच्या सहकार्यामुळे आज या संकट काळात मला सेवा देता येत आहे.

- Advertisement -
Women Conductor Kimya Kalekar with her daughter
महिला कंडक्टर किमया कालेकर आपल्या चार वर्षांच्या मुलीसोबत

कोरोना योद्धांची सेवा करण्याचा मिळतो आनंद

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अनेक महिला आज कर्तव्यावर जात आहेत. महिला डॉक्टर, पोलीस आणि स्वछता कार्माचारी आपल्या जीवाची आणि कुटूंबियांची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत. त्याच प्रमाणे या लॉकडाऊन काळात आम्हाला या कोरोना योद्धांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. यांच्या मला खूप आनंद होत आहे. मला दोन मुलं आहेत. कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांची ओढताण होत आहे. मात्र पती आणि मी सुद्धा अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही कामावर जात आहोत. सध्या अनेक एसटी कर्मचारी लॉकडाऊनमुळे गाव खेड्यात अडकले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नयेत याकरिता कर्तव्यावर जात आहे.

Women Conductor Jayashree Kanchakatle with her children
महिला कंडक्टर जयश्री कंचकटले आपल्या दोन मुलांसोबत

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -