घरमहाराष्ट्रसुनील तटकरे नक्की कोणत्या पक्षाचे?

सुनील तटकरे नक्की कोणत्या पक्षाचे?

Subscribe

शेतकरी भवनवर मोठे होर्डिंग

रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे नक्की कोणत्या पक्षात आहेत, अशी चर्चा सध्या शहरात रंगली आहे. याचे कारणही तसेच आहे. तटकरे यांच्या प्रचाराच्या तालुक्यात आतापर्यंत तीन सभा झाल्या. त्यातील दोन सभा शेकापने पुढाकार घेऊन आयोजित केल्या होत्या. त्यातील एक शेकाप कार्यकर्त्यांसाठी होती, तर एक उमेदवारी अर्ज भरतानाची होती. काँग्रेसने एक सभा काँगेस भवनमध्ये आयोजित केली होती. आता तटकरे यांचे मोठे होर्डिंग शेतकरी भवनवर लागले आहे. ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. परंतु शहारातच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मात्र अजनूही त्यांच्या प्रचाराचा बॅनर लागलेला नाही.

लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच तटकरे यांचे बॅनर सगळीकडे झळकत होते. त्यातील एकही बॅनरदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या परिसरात झळकला नाही. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप तटकरे यांची सभा देखील आयोजित केलेली नही. सध्या राष्ट्रवादी काँगेस कार्यालयाच्या परिसरात पक्षासह शेकापचे झेंड लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली ती देखील शेतकरी भवनमध्ये. उमेदवारी जाहीर झाल्यांनतर तरी एखादा जाहीर कार्यक्रम राष्ट्रवादी कॉँगेस कार्यालय परिसरात घेतील, अशी अपेक्षा होती तसेही काही अजून तरी घडलेेले नाही. त्यामुळे तटकरे नक्की कोणत्या पक्षाचे आहेत, शेकाप की राष्ट्रवादी काँग्रसचे, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -