घरमहाराष्ट्रवीज वितरणाच्या सिंधुदुर्ग कार्यालयावर आंदोलन

वीज वितरणाच्या सिंधुदुर्ग कार्यालयावर आंदोलन

Subscribe

वीज कंपनीमुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे स्वाभिमान पक्षाने सिंधुदुर्ग कार्यालयावर आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याची घोषणाही त्यांनी दिली आहे.

वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेला त्रास होण्याच्या तक्रारी सिंधुदुर्ग परिसरात येत होत्या. वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारा, जनतेची कंपनीकडून होणारी पिळवणूक थांबवा, ग्राहकांशी उध्दट भाषा वापरणाऱ्या भुईबावडा शाखा अभियंता एस.वाय. इंदलकर या महिला अधिकाऱ्यांची तालुक्यातून उचलबांगडी करा. या मागणीसाठी वैभववाडी स्वाभिमान पक्षाने येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेरावा घातला. वीज कंपनीच्या विविध समस्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, प्रवक्ते भालचंद्र साठे व पदाधिकाऱ्यांनी प्रभारी अधिकारी जी.एम. मुल्ला यांच्याकडे दिले.

आठ दिवसांची मुदत 

येत्या आठ दिवसात वीज कंपनीचा कारभार न सुधारल्यास कार्यालयावर मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशारा साठे यांनी दिला आहे. मुल्ला तालुका वीज वितरणचा भार तुमच्या बुध्दीच्या बाहेरचा आहे. आपण सन्मानाने या प्रमुख पदावरुन बाजूला व्हावे. अशी धमकी वजा विनंती साठे यांनी केली. दरम्यान ग्राहकांशी उध्दट बोलणा-या भुईबावडा विभागाच्या शाखा अभियंता इंदलकर यांना तात्काळ याठिकाणी हजर करा. तिचा समाचार आम्हाला घ्यायचाच आहे. असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानच्या महिला रणरागिणींनी घेतला. गुरूवारी त्या महिला अधिकाऱ्याला भेटण्यासाठी परत कार्यालयात येणार असा इशाराही प्राची तावडे, शुभांगी पवार, भारती रावराणे यांनी दिला. मागील महिन्यात तीनशे रुपये बील, मग चालू बील एकोणतीस हजार कसे. असा सवाल जयेंद्र रावराणे यांनी केला. चुकीच्या पध्दतीने रिडींगचे काम करणाऱ्या संबंधित एजन्सीकडून मक्ता काढून घेण्यात यावा, अशी मागणी रावराणे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -