घरमहाराष्ट्रराज्य सरकारतर्फे कुष्ठरोगी, असंसर्गजन्य आणि टीबीचे रुग्ण शोधण्याची मोहिम हाती

राज्य सरकारतर्फे कुष्ठरोगी, असंसर्गजन्य आणि टीबीचे रुग्ण शोधण्याची मोहिम हाती

Subscribe

राज्यातील लोकांना कुष्ठरोगापासून सुटका मिळावी आणि त्याबाबत असणाऱ्या गैरसमजांना आळा बसावा, यासाठी येत्या १४ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबरपर्यंत एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे.

राज्यातील लोकांना कुष्ठरोगापासून सुटका मिळावी आणि त्याबाबत असणाऱ्या गैरसमजांना आळा बसावा, यासाठी येत्या १४ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबरपर्यंत एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. मुंबईसह राज्यात सरकारतर्फे ही मोहिम राबवण्यात येणार आहे. याशिवाय या मोहिमेत कुष्ठरोगासोबत असंसर्गजन्य आजार आणि टीबीच्या रुग्णांचेही सर्व्हेक्षण केले जाणार आहे. ज्यामुळे हे आजार बरे होऊन त्यावर किमान नियंत्रण मिळवता यावे, असा सरकारकडून प्रयत्न केला जाणार आहे.

राज्यातील आणि मुंबईतील आरोग्य सेविका या मोहिमेत विशेष सहभागी असणार आहेत. आरोग्य सेविका घराघरांमध्ये जाऊन या आजारांविषयी माहिती घेणार आहेत. याशिवाय, या मोहिमेदरम्यान आढळणाऱ्या रुग्णांच्या अनेक तपासण्या, चाचण्या आणि पुढील उपचारही केले जाणार आहेत.

- Advertisement -

कुष्ठरोग, टीबी तसेच असंसर्गजन्य आजार जसे की मधुमेह, कर्करोग आणि इतर मोठ्या आजारांमध्ये होणारी गुंतागूंत टाळण्यासाठी आणि या आजारांबाबत जनजागृतीसाठी व्हावी, यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहेत. त्यानंतर उपचार ही सोपे होणार आहेत. आरोग्य सेविका यासाठी काम करणार आहेत. त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाणार आहे.
– डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

कुष्ठरुग्णांविषयी समाजात असलेला गैरसमज आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, त्यासोबतच नव्या पिढीमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढावी. शिवाय, असंसर्गजन्य आजार म्हणजेच जसे की, मधुमेह, कर्करोग, उच्चरक्तदाब, हृदयरोग, मानसिक रोग या अशा पूर्णपणे बरा न होणाऱ्या पण नियंत्रणात राहू शकणाऱ्या आजारांबाबत माहिती आणि उपचार देण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असेल, असे मत महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -