घरमहाराष्ट्रपवना धरणात बुडून इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पवना धरणात बुडून इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Subscribe

धरणामध्ये पोहत असताना सुजित आणि रोहित या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

पवना धरणामध्ये बुडून इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत. आज दुपारी एक वाजता ही घटना घडली आहे. हे दोन्ही विद्यार्थी पवना धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान त्याचा धरणामध्ये बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना

सुजित जनार्दन घुले (२१, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. अहमदनगर) आणि रोहित कोडगिरे (२१, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. पोलिस कॉलनी, नांदेड) अशी धरणात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे ११ विद्यार्थी हे आज मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते फागणे गावाच्या बाजुने पोहण्याकरिता धरणाच्या पाण्यात उतरले.

- Advertisement -

दोघांचा शोध सुरु

धरणामध्ये पोहत असताना सुजित आणि रोहित या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या इतर मित्रांनी प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचा शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -