घरमहाराष्ट्रपुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन विद्यार्थ्यांचे रॅगिंग

पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Subscribe

पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन विद्यार्थ्यांचे रॅगिंग करण्यात आले असून याप्रकरणी ६ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये दोन विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी दोन्ही विद्यार्थी रॅगिंग करुन त्यांना मारहाण केली होती. या मारहाणीत दोन्ही विद्यार्थी जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सहा विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे रँगिंग

पुण्यातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजच्या वस्तीगृहामध्ये राहत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचे रॅगिंग करण्यात आले. त्याच वस्तीगृहामध्ये राहत असलेल्या सहा विद्यार्थ्यांनी रॅगिंग करुन त्यांना बेदम मारहाण केली. आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित दोन विद्यार्थ्यांच्या रुममध्ये प्रवेश करुन त्यांच्या डोक्यात आरसा फोडला आणि त्यांना लाथाबुक्क्या टाकत मारहाण केली. तसंच यापुढे आम्हाला भाई म्हणून नमस्कार करायची अशी धमकी या पीडित विद्यार्थ्यांना दिली होती.

- Advertisement -

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित विद्यार्थ्यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या सहा आरोपींपैकी दोन विद्यार्थी अल्पवयिन असल्याचे देखील समोर आले आहे. याप्रकरणाचा तपास कोंडवा पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -