घरमहाराष्ट्रनिवडणूक कामाहून परतणाऱ्या दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू

निवडणूक कामाहून परतणाऱ्या दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत आटोपले असतानाच एक चटका लावून जाणारी बातमी पुढे आली आहे. निवडणुकीचे काम आटोपून आपल्या गावी परणाऱ्या उमरेड येथील दोन शिक्षकांचा काल, गुरुवारी मध्यरात्री अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. नुकेश नारायण मेंढुले आणि पुंडलित बापूराव बहे अशी मृत शिक्षकांची नावे असून त्यांच्या सोबत असलेले इतर दोन शिक्षक या अपघातात गंभीर जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या चांपा शिवारात शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात मेंढुले आणि बहे मृत्यूमुळे पडले तर विजय बोहरूपी आणि रमेश पिपरे हे दोघे जखमी झाले आहेत. या शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती.

निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक पहाटेच्या सुमारास एमएच १२ जीएफ ४५४७ या चारचाकी वाहनाने उमरेड येथे निघाले होते. रमेश पिपरे हे वाहन चालवत असताना वाहनाने एका झाडाला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की वाहनाचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. यामध्ये नुकेश मेंढुले हे जागीच ठार झाले तर पुंडलीक बहे यांचा सकाळच्या सुमारास मेडिकल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले. तर दोन शिक्षक जखमी झाले आहेत. अपघातातील दोन जखमी शिक्षकांना उपचारासाठी नागपुरातील मेडीकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. नुकेश उमरेड येथील अशोक विद्यालयात कार्यरत होते. तर पुंडलीक बहे हे कुही तालुक्यातील साळवा येथील खापर्डे विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.

- Advertisement -

दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातही अशाच प्रकारची दुर्दैवी घटना पुढे आली असून तेथे देखील मतदानाचं काम आटपून परतणाऱ्या शिक्षकांच्या एका वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात शुक्रवारी अल्टो आणि बोलेरो कारमध्ये अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -