घरदेश-विदेशउदयनराजे भोसले यांचा भाजपात प्रवेश

उदयनराजे भोसले यांचा भाजपात प्रवेश

Subscribe

उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन आज भाजपात प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. भाजप पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसणीनुसार काम करत असल्यामुळे आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे उदयनराजे यावेळी म्हणाले. तर, देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आपल्याला आनंद झाल्याचे अमित शहा म्हणाले. अमित शहा यांनी भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्यावतीने उदयनराजे यांचे पक्षात स्वागत केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर शरीरात चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या घराण्याचे नाव रोशन करणारे उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने आपल्याला आनंद झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा देणारा मी पहिलाच असणार’

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला. त्यांच्या कामकाजांसाठी विशिष्ठ असे अष्टप्रधान मंडळ होते. शिवाजी महाराजांच्या नितीमुल्यांवरच भाजप पक्ष चालत आहे आणि याच मुल्यांच्या आधारावर आज देशात लोकशाही जीवंत आहे. प्रत्येक राज्यात भाजपने प्रगती केली. त्यामुळे अनेक लोक भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. त्यामागील कारण एकच आहे आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्व. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर मुद्द्याकडे कुणी गांभिर्याने पाहिले नव्हते. देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधितपणे जीवंत राहण्यासाठी मोदीजींनी काश्मीरबाबत अतिशय योग्य निर्णय घेतला’, असे उदयनराजे भोसले भाजपप्रवेशावेळी म्हणाले. याशिवाय ‘केवळ तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा देणारा मी पहिलाच असेल. निस्वार्थपणे लोकांचे हित डोळ्यांसमोर ठेऊन मी तीन महिन्यांनंतर राजीनामा दिला आहे. मोदीजींच्या विचारांशी मी सहमत आहे. त्यामुळे मी आता भाजपसोबत काम करणार आहे आणि माझ्या घराण्याची समाजकार्याची परंपरा सुरु ठेवणार’, असेही उदयनराजे म्हणाले.

- Advertisement -

‘उदयनराजे राजे जनतेचा विचार करतात’

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर शरीरात चैतन्य आणि ऊर्जा संचारते. त्यांच्या घराण्याचे नाव रोशन करणारे उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उदयनराजे महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार आहेत. मोदी सरकारने काश्मीरबाबत जो निर्णय घेतला तो निर्णय उदयनराजेंना आवडला. त्यामुळे या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. उदयनराजे हे राजे आहेत मात्र लोकशाहीला ते प्रथम प्राधान्य देतात. ते जनतेचा विचार करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवावर्ग त्यांचा चाहता आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आम्ही काम केले. त्यामुळे आता उदयनराजेंनी भाजप प्रवेश केल्याने आम्ही एकत्र काम करणार आणि त्याचा भाजपला फायदाच होणार’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात लोकसभा पेक्षा जास्त यश विधानसभेत येईल – अमित शहा

‘देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. उदयनराजे यांचे मी भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्यावतीने पक्षात स्वागत करतो’, असे अमित शहा म्हणाले. ‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहोत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला महाराष्ट्रात लोकसभेपेक्षा जास्त यश मिळेल’, असेही अमित शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -