तर मलाच नक्षलवाद्यांचे नेतृत्व करावे लागेल – उदयनराजे भोसले

राज्यातील जनतेचे प्रश्न उग्र स्वरुपाचेवक्त आहेत. त्यांची सोडवणूक झाली नाही तर त्यांच्यातून नक्षलवादी तयार होतील, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

Satara
Udayanraje bhosle
उदयनराजे भोसले यांनी बैलगाडीत बसून मोर्चाला पाठिंबा दिला.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. उदयनराजे कधी थेट जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासोबत बसतात, गप्पा मारतात. तर कधी स्वपक्षालाच ठोकून काढतात. राजकारणात माझे सर्व पक्षात मित्र आहेत, अशी धमकीवजा प्रतिक्रियाही ते शरद पवार यांना देऊन टाकतात. उदयनराजे यांचे प्रत्येक वक्तव्य बातमीचा विषय बनत असते. सध्या त्यांनी असेच एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात काढण्यात आलेल्या मोर्चात उदयनराजे यांनी हे भलतेच वक्तव्य केले.

उदयनराजे म्हणाले की, “दुष्काळामुळे राज्यातील जनता होरपळून निघत आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर हीच जनता नक्षलवादी बनेल. जर हे लोक नक्षली झाले तर मलाच या लोकांचे नाईलाजाने नेतृत्व करावे लागेल. खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा नाहीतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.” सरकारला इशारा देण्यासाठी उदयनराजे यांनी हे वक्तव्य केले असले तरी यामुळे नवा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.

खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी व सर्वपक्षीय नेते यांचे समवेत बैलगाडीतुन येऊन प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले व पत्रकार मित्रांसमोर भूमिका स्पष्ट केली.

Posted by Chhatrapati Udayanraje Bhonsle on Monday, 5 November 2018

सातारा जिल्ह्यातील खटाल तालुका हा नेहमीच दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्तांच्या यादीत खटावचा समावेश केलेला नाही. त्यामुळे खटावमधील जनतेने सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. खासदार उदयनराजे भोसले साताऱ्याचे खासदार या नात्याने या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केल्यामुळे खटाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होऊ शकला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळेच दिवाळीच्या ऐन सणात खटावकरांनी खर्डा भाकरी खाऊन आंदोलन केले. उदयनराजे भोसले वडुज या आंदोलनात सहभागी झाले. तसेच वडूज तहसील कार्यालयावर बैलगाडीतून मोर्चा काढून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here