घरमहाराष्ट्रसावरकरांचा अवमान करणाऱ्या लोकांना भरचौकात फटकावले पाहीजे - उद्धव ठाकरे

सावरकरांचा अवमान करणाऱ्या लोकांना भरचौकात फटकावले पाहीजे – उद्धव ठाकरे

Subscribe

“सावरकरांचा अवमान सर्वात आधी राहुल गांधी यांनी केला होता. सावरकरांना अवमान करणाऱ्या लोकांना भरचौकात फटकावले पाहीजे. त्याशिवाय या लोकांना स्वातंत्र्याचे मोल कळणार नाही.” अशी संतत्प प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मातोश्री येथे पिक विम्यासंबंधी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना उद्धव यांनी यावर भाष्य केले. दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या सावरकरांच्या पुतळ्यास एनएसयूआय संघटनेने काळे फासल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर देशभरात सावकरप्रेमींनी रोष व्यक्त केला असून उद्धव ठाकरेंनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

शिवसेनेने शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी काही दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. त्यामुळेच १० लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली, असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून मधले एंजट हे झारीतरले शुक्राचार्य बनले असल्याची टीकाही त्यांनी केली. पिक विमा कंपनीने ९० लाख शेतकरी मदतीस अपात्र ठरविले आहेत. हा अधिकार त्यांना कुणी दिला? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

- Advertisement -

सरकारने पिक विमा कंपन्यांना त्यांचा नफा वगळून उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच पिक विमा योजना सुरळीत चालून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -