घरमहाराष्ट्र#UddhavResign ट्रेंड ट्विटर टॉप

#UddhavResign ट्रेंड ट्विटर टॉप

Subscribe

#UddhavResign Trends Twitter Top

करोनाविरोधात महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आता राजीनाम्याची मागणी करणारा ट्रेंड ट्विटरवर गर्दी करू लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजुने आणि विरोधात असे परस्पर विरोधी ट्रेंड यानिमित्ताने समोर आले आहेत. जवळपास ४० हजारांहून अधिक लोकांनी #UddhavResign हा हॅशटॅग वापरून ट्विट केले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नावेही ४० हजार नेटकरांनी ट्विटरवर ट्विट्स केले आहेत.

वांद्रे स्टेशनवर जमलेल्या गर्दीने ट्विटरकरांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचे कोरोनाविरोधातील परिस्थिती हाताळण्यात संपुर्ण व्यवस्थापन कोलमडल्याची टीका ट्विटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भाजप समर्थकांनीही हाच मुद्दा घेऊन दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट केले आहे. तर अनेक ट्विटर युजर्सने भाजपच्या या खालच्या पातळीच्या राजकारणाविरोधात टीका केली आहे. अनेक युजर्सने मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत महाराष्ट्राचे नेतृत्व चांगल्याप्रकारे केल्याचेही म्हटले.

- Advertisement -

राधिका पांडे या ट्विटर युजरने उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची तुलना करत दोघेही एकसारखच काम करत असल्याची टीका केली आहे. एक मुख्यमंत्री आनंद विहार तर एक मुख्यमंत्री वांद्रे येथून एकसारखच काम करत असल्याची टीका करत Brother from another mother असे म्हणत कमेंट केली आहे. आनंद कुमार या ट्विटर युजरने आदित्य ठाकरे यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत करत हे घराणे शाहीतून आलेल बाळ आहे. भारतीयांना या राजकीय पप्पूंना वाचवण्याची गरज असल्याची कमेंट त्यांनी केली आहे. तर केंद्र सरकार अतिशय घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात होत आहे.

महाराष्ट्र सरकारविरोधात ही खेळी असल्याची टीकाही करण्यात आली आहे. अतुल गुप्ता या ट्विटर युजरने ट्विट केले आहे की तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहू इच्छिता तर #UddhavResign असलेले ट्विट रिट्विट करा असेही आवाहन करण्यात आले आहे. ट्विट करणार्‍यांमध्ये अनेकजण हे भाजपचे समर्थक असल्याने त्यांच्याविरोधातही ट्विटर युजरने टीकेची झोड उडवली आहे. शिवसेना लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व गोष्टी सुस्थितीत ठेवण्यासाठी अपयशी ठरल्याची टीकाही ट्विटरवर करण्यात आली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनाही नेटकरांनी लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासूनच आणखी २४ तास ट्रेन सुरू कराव्यात अशी मागणी मजुरांच्या वतीने महाराष्ट्राकडून पंतप्रधानांना करण्यात आली होती. त्यामुळे मजुर आपल्या घरी जाऊ शकतील असेही सांगण्यात आले होते. या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठीचा रोडमॅपची उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी नाकारली. या ट्विटनंतर आदित्य ठाकरे यांनाही ट्रोल करण्यात आले.

अशीही दिरंगाई
दोन दिवसांपूर्वी मालेगावमधील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आलेल्या संशयितांपैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांनी एका उच्च पदस्थ अधिकार्‍याला फोन केला. मात्र, संबंधित अधिकार्‍याला याबाबत माहिती कळवण्यात येऊनदेखील दुसर्‍या दिवशीपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍याला समज दिल्याचे समजते. मात्र यावरून प्रशासकीय दिरंगाई समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -