घरमहाराष्ट्रनाशिकसायंकाळी ७ वाजेपर्यंत रांगा : उ. महाराष्ट्रात मतदानाचा टक्का ५६.२० टक्क्यांवर

सायंकाळी ७ वाजेपर्यंत रांगा : उ. महाराष्ट्रात मतदानाचा टक्का ५६.२० टक्क्यांवर

Subscribe

उन्हाचा प्रचंड कडाका, उष्ण वारे आणि नावांसह मतदान केंद्र शोधताना होणारी दमछाक अशा परिस्थितीतही दुपारी ३ वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात ४५.१० टक्के मतदान झाले.

महिनाभरापासून तापलेल्या राजकीय वातावरणाने मतदानाच्या दिवशी उन्हाच्या कडाक्यावरही मात केल्याचे दिसून आले. मतदार राजाने भर उन्हातही मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीला बळ दिले. मतदान केंद्रांवर नाव शोधण्यात होणारी ससेहोलपट आणि उकाडा यामुळे बहुतांश केंद्रांवर मतदारांचा व्यवस्थेविरोधातील रोष दिसून आला. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात ६०.०५ टक्के मतदान झाले. दुपारी ५ नंतर मतदानासाठी घराबाहेर पडलेल्यांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघात सायंकाळी ५ पर्यंत ५४.५० टक्के मतदान झाले.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत रांगा

शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढू लागली होती. मतदानाची वेळ संपेपर्यंत हा ओघ सुरूच राहिल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यात सिन्नर फाटा येथील मतदान केंद्र क्रमांक १२५ व १२६, नाशिकमधील रचना विद्यालय, बी. डी. भालेकर हायस्कूल, नागजी मनपा शाळा, फुलेनगर येथील मतदान केंद्रांचा समावेश आहे.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्रातील मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी अशी…

नाशिक –    (स. ९ पर्यंत – ७ %), (दु. ११ पर्यंत – १७ %), (दु. १ पर्यंत – ३०.५ %), (दु. ३ पर्यंत-४१ %), (दु. ५ पर्यंत- ५३.५० %), (दु. ६ पर्यंत- ५४.५० %),

दिंडोरी –    (स. ९ पर्यंत – ७.५ %), (दु. ११ पर्यंत – २१ %), (दु. १ पर्यंत – ३५.५ %), (दु.३पर्यंत-४५.५० %) , (दु. ५ पर्यंत- ५८ %), (दु. ६ पर्यंत- ६३.५० %),

नंदुरबार  –  (स. ९ पर्यंत – ८.५ %), (दु. ११ पर्यंत – २४ %), (दु. १ पर्यंत – ४० %), (दु. ३ पर्यंत-५१.५० %) , (दु. ५ पर्यंत- ६२ %), (दु. ६ पर्यंत- ६७ %),

धुळे –        (स. ९ पर्यंत – ७ %), (दु. ११ पर्यंत – १८ %), (दु. १ पर्यंत – ३१.५ %), (दु. ३ पर्यंत-४१ %), (दु. ५ पर्यंत- ५१ %), (दु. ६ पर्यंत- ५५.७५ %),

शिर्डी –  (स. ९ पर्यंत-७.५ %), (दु. ११ पर्यंत-२०.५ %), (दु. १ पर्यंत-३४.४० %), (दु. ३ पर्यंत-४५.५० %), (दु. ५ पर्यंत- ५६.५० %), (दु. ६ पर्यंत- ५९.५० %).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -