ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच निधन

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Pune,Maharashtra
Lalan sarang
ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. पुण्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्य तसेच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये लालन सारंग यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘महेक’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. तसेच रंगभूमीवरील त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ या नाटकांमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या तिन्ही नाटकांतील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या होत्याच शिवाय जगण्याचं भान देणाऱ्या होत्या, असं लालन सारंग यांनी म्हटलं होतं.

अनेक पुरस्काराने सन्मानित 

प्रसिद्ध निर्माते कमलाकर सारंग हे त्यांचे पती तर दिग्दर्शक राकेश सारंग हा त्यांचा मुलगा. लालन सारंग यांचा ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here