घरमहाराष्ट्रशिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : निकालाचा नक्कीच परिणाम घडेल - देवेंद्र फडणवीस

शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : निकालाचा नक्कीच परिणाम घडेल – देवेंद्र फडणवीस

Subscribe

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात मतदान केले. लोकशाहीला मजबुत करण्यासाठी मतदानाला यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या निवडणुकीतही भाजपलाच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निकालाने खूप काही बदलत नसत, पण याचा नक्कीच परिणाम घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपुर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी तर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांच्यामध्ये चुरस आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत चांगल समर्थन मिळाल आहे. या निवडणुकीत चांगल यश प्राप्त मिळेल असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक निवडणुक ही परीक्षाच असते. पण मला विश्वास या परीक्षेत निश्चित चांगल्या प्रकारे पास होईल असे त्यांनी सांगितले. सर्व मतदारांना आवाहन घटनेने अधिकार दिला आहे. म्हणून नोंदणीकृत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान कराव असे ते म्हणाले. सुशिक्षित सुजाणांनी मतदान करावे असे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. अचानक निवडणुक घोषित झाल्याने याद्यांमध्ये घोळ दिसतोय. त्यामुळेच कुठेतरी सिस्टिम निवडणुक आयोगाला सुधारावी लागेल असेही मत त्यांनी मांडले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -