घरताज्या घडामोडीहिंगणघाट प्रकरण: पीडितेचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा गौरव

हिंगणघाट प्रकरण: पीडितेचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा गौरव

Subscribe

हिंगणघाट जळीतकांडातील प्रकरणातील पीडितेचा सोमवारी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसंच अजूनही राज्यभरात नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. पीडितेच्या मृत्यूबाबत समोर येताच सर्व दारोडा ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त करत दगडफेक केली. यावेळी पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान दाखवलं. दरम्यान, गावकऱ्यांनी पार्थिव गावात येऊ नये म्हणून रास्ता रोखो केला, रस्त्यावर लाकडं आडवी टाकली. त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज होत होता. तरी देखील अशा तणावपूर्ण वातावरणात चालकाने निर्भयतेने रुग्णवाहिका पीडितेच्या घरांपर्यंत व्यवस्थित नेली. यामुळे पोलीस प्रशासनाने चालकाने दाखवलेल्या धाडसाबद्दल त्याच्या पत्नीसह सत्कार केला.

पीडितेचा मृत्यू झाल्यामुळे दारोडा या गावावर शोककळा पसरली होती. गावातील सर्व दुकाने बंद आणि घरे बंद करण्यात करण्यात आली होती. तर काही गावकऱ्यांनी गावातील चौकात येऊन घटनेचा निषेधही नोंदवला होता. त्यामुळे कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून गावात ३०० पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आले होते. दरम्यान, गावकऱ्यांनी पार्थिव गावात येऊ नये, म्हणून रास्ता रोखो केला होता. रस्त्यावर लाकडं आडवी टाकली होती. तसेच जमलेल्या समुदयांनी पोलिसांच्या दिशेने तसेच रुग्णवाहिकेच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी देखील गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला. हा सर्वप्रकार रुग्णवाहिका चालकाचं कुटुंब टीव्हीवर लाईव्ह पाहत होत. यामुळे चालकाची पत्नी वैशाली जयपाल वंजारी प्रचंड भीतीच्या वातावरणात होती. सात वर्षांची जयपाल वंजारी यांना मुलगी आहे.

- Advertisement -

काय आहे हिंगणघाट प्रकरण?

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे यांने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पीडित तरुणी सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. मात्र पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.


हेही वाचा – धक्कादायक! सोलापुरात रिक्षाचालकांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -