घरमहाराष्ट्रसरकारी हॉस्पिटलमध्ये अवयवदानासाठी झेडटीसीसीचे समन्वयक

सरकारी हॉस्पिटलमध्ये अवयवदानासाठी झेडटीसीसीचे समन्वयक

Subscribe

अवयवदानाच्या चळवळीसाठी मुंबई जिल्हा अवयवदान प्रत्यारोपण समिती घेणार पुढाकार

राज्यात खासगी हॉस्पिटलच्या पाठोपाठ सरकारी हॉस्पिटलमध्येही अवयवदानाची चळवळ वाढावी यासाठी आता पुढाकार घेतला जाणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये अवयवदानाचे महत्त्व सांगण्यासाठी मुंबई जिल्हा अवयवदान प्रत्यारोपण समिती आता पुढाकार घेऊन समितीचा समन्वयक नेमण्याच्या तयारीत आहे. यामुळे, सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील अवयवदानाची आकडेवारी वाढण्यास मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील महेश येरुणकर याचे अवयवदान करण्यासाठी झेडटीसीसीच्या समन्वयकाने पुढाकार घेतला होता. त्यामुळे, राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या काळानंतर अवयवदान पार पडले. महाराष्ट्र राज्य अवयवदान चळवळीत देशात अव्वल आहे. पण, अवयवदानाची आकडेवारी बहुतांश खासगी हॉस्पिटलमधील अधिक असल्याचे समोर येत आहे. नुकतेच केईएम हॉस्पिटलमध्ये देखील यकृताचे दान झाले. हे अवयवदान अडीच वर्षानंतर झाले होते. तर जे.जे हॉस्पिटलमध्ये महेश येरुणकरचे अवयवदान बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर झाले. यामुळे, सरकारी हॉस्पिटलमधील अवयवदान प्रक्रियेला हुरुप येण्यासाठी विशेष समन्वयक नेमण्याचे ठरत आहे.

- Advertisement -

मुंबईतील दोन्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या अवयवदानासाठी झेडटीसीसी समितीतील समन्वयकांची मदत घेण्यात आली होती. हे समन्वयक रुग्णाच्या कुटुंबियांचे समुपदेशन करतात. तसेच यासाठी लागणाऱ्या कायदेशीर आणि कागदोपत्री प्रक्रिया सोप्या करून सांगतात. तसेच, नातेवाईकांच्या इतर शंकांचे निरसन करतात. त्यामुळे, लवकरच सरकारी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र अवयवदान समन्वयक नेमण्याचा निर्णय जिल्हे अवयवदान प्रत्यारोपण समितीने घेतला आहे. त्यासाठी कोणतीही मदत करण्यात येईल असे मुंबई झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. सतीश माथूर यांनी सांगितले. या समन्वयामुळे अवयवदान चळवळीला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. त्यासाठी सर्वाधिक रुग्णांची गर्दी असलेल्या केईएम आणि जे जे हॉस्पिटसोबत चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -