घरमुंबईराऊत, गोयल यांच्यात ट्विटर युद्ध

राऊत, गोयल यांच्यात ट्विटर युद्ध

Subscribe

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात सोमवारी चांगलेच ट्विटर युद्ध रंगले. रेल्वेमंत्री गोयल यांच्या ट्वीटला उत्तर देताना पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय विसरु नका अशी आठवण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन करुन दिली आहे.

पियुषजी, १४ मे रोजी सुटलेल्या नागपूर-उधमपूर ट्रेनसाठी कुठली यादी घेतली होती? आधी ट्रेन, नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय, हे विसरु नका असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

कसे रंगले ट्विटर युद्ध?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आम्हाला पुढील एका तासात मजुरांची यादी द्या. तुम्ही जितक्या ट्रेन सांगाल, तितक्या ट्रेन उपलब्ध करुन देऊ, असे ट्वीट पियुष गोयल यांनी संध्याकाळी सव्वासातला केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना केंद्राकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत, अशी टीका केली होती. या टीकेवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिले होते.

रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवरुन संजय राऊत यांनीही निशाणा साधला होता. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओदिशाला पोहोचू नये, असे संजय राऊत मिश्किलपणे म्हणाले होते.

- Advertisement -

रात्रीचे १२ वाजले असून पाच तासानंतरही आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून उद्याच्या १२५ गाड्यांचा तपशील आणि प्रवासी यादी मिळाली नाही. मी अधिकार्‍यांना वाट पाहत तयारी सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे ट्वीट पियुष गोयल यांनी मध्यरात्री सव्वाबारा वाजता केले होते. माझी विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने आम्हाला पुढच्या एका तासात किती गाड्या, गंतव्य स्थान आणि प्रवाशांच्या याद्या पाठवाव्यात. आम्ही उद्याच्या गाड्यांची तयारी करण्यासाठी रात्रभर थांबलो आहोत. कृपया पुढील तासात प्रवासी याद्या पाठवा असेही त्यांनी दुसर्‍या ट्वीटमध्ये म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -