उल्हासनगरमध्ये फक्त १० रुपयात मिळणार थाळी!

उल्हासनगर शहरात १० रुपयांत थाळी मिळणार असल्याची घोषणा 'टिम ओमी कलानी' पक्षाचे प्रमुख 'ओमी कलानी' यांनी केली आहे.

Mumbai
10rs. meal will be available in ulhasnagar soon
प्रातिनिधिक फोटो

उल्हासनगर शहरात ‘टिम ओमी कलानी’या (TOK) पक्षाचे प्रमुख ‘ओमी कलानी’ यांनी स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये ‘ओमी कलानीं’ची पत्नी महापौर पंचम कलानी यासुद्धा त्यांना सहकार्य करणार आहेत. पोळी -भाजी, कांदा, लोणच्याची थाळी फक्त १० रुपयांत मिळणार आहे. या कामाची जबादारी त्यांनी महिला बचत गटांकडे सोपवली असून शहरात ठिकठिकाणी स्टॉल उघडण्यात येणार आहेत. शहरातील सुमारे ३०० महिला बचत गट हे अन्न उपलब्ध करून देणार आहेत. शहरातील एका मुख्य केंद्रात हे सर्व अन्न बनवण्यात येईल. त्यानंतर शहरातील प्रमुख नाके, चौक तसंच शहाड रेल्वे स्थानकाजवळ हे अन्न उपलब्ध करुन दिले जाईल. सर्वसामान्य स्थानिक तसंच कामासाठी येणाऱ्या-जाणारे लोक केवळ १० रुपयांत या जेवणाचा अस्वाद घेऊ शकतात. विशेष म्हणजे नागरिकांना हे जेवण पार्सल हवे असल्यास त्यासंबंधीचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ओमी कलानी यांनी दिली आहे.

महिला बचत गटांना आधार

या उपक्रमाविषयी बोलताना महापौर पंचम कलानी यांनी सांगितले की, ‘जेवणाचा दर्जा, स्वच्छता या सर्व गोष्टींची काळजी घेण्यात येणार आहे. महिला बचत गटांना हे काम सोपविण्यात आल्यामुळे त्यांनाही दरमहा किमान १८ हजार रुपये नफा होणार आहे. पोळी -भाजी, कांदा, लोणचे इ. पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीमागे बचत गटांना २ रुपये मिळणार आहेत.