दहिसर येथे 40 वर्षांच्या इस्टेट एजंटची आत्महत्या

Mumbai
आत्महत्या

दहिसर येथे राहणार्‍या अमोल फ्रॉन्सिस वैती नावाच्या एका 40 वर्षांच्या इस्टेट एजंटने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्राथमिक तपासात वसुली एजंटच्या मानसिक त्रासाला कंटाळून अमोलने जीवन संपविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना पावणेआठ वाजता दहिसर येथील कांदरपाडा, अमोल निवास, वैती हाऊसमध्ये घडली. याच ठिकाणी अमोल हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. सकाळी तो पत्नीला टिव्ही पाहतो असे सांगून हॉलमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याने लोखंडी हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने पोलिसांना ही माहिती दिली.

ही माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अमोलला तातडीने पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून आत्महत्येपूर्वी त्याने त्याच्या नातेवाईकांना एक मॅसेज पाठविला होता. या मॅसेजमध्ये त्याने घडलेला प्रकार नमूद करुन वसुली एजंटच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्यात तिने अमोल हा काही दिवसांपासून मानसिक तणावात हातेता. तो फारसे कोणाशी बोलत नव्हता, त्याला कर्जाचे टेन्शन होते, त्यातच एजंटकडून होणार्‍या अपमानास्पद वागणुकीला तो कंटाळून गेला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here