Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई सोनू सूदने बांधले अनधिकृत हॉटेल मुंबई महापालिकेने केली पोलिसात तक्रार

सोनू सूदने बांधले अनधिकृत हॉटेल मुंबई महापालिकेने केली पोलिसात तक्रार

Related Story

- Advertisement -

अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.

महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारीला तक्रार दाखल केली आहे. सहा मजली इमारत परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याची पालिकेची तक्रार आहे. सोनू सूदला याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केलीय.

- Advertisement -

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता रुपांतर केल्यामुळे पालिकेने पोलीस ठाण्यात सोनू सूदविरोधात तक्रार केली आहे.

मी अगोदरच महापालिकेकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे. सध्या मी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षेत आहे.
-सोनू सूद, बॉलिवूड अभिनेता.

- Advertisement -

इतका द्वेष येतो कुठून?
आधी कंगनावर कारवाई केली. आता सोनू सूदवर कारवाई करण्यात येत आहे. हे ठाकरे सरकार आहे की सुडाचे सरकार? कंगनाच्या कार्यालयावर जेसीबी पाठवला. आता सोनूचा नंबर? गरीब मजुरांना स्वत:च्या पैशाने गावी पाठवण्याचे काम सरकारचे होते. ते सोनूने केले. त्याचा दोष काय? इतका दोष येतो कुठून? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.

- Advertisement -