घरताज्या घडामोडीटिव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

टिव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

Subscribe

चंदेरी दुनियेची काळी बाजू

छोट्या पडद्यावरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्माने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मीरा रोड येथील घरात तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वैयक्तिक करणांमुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट देखील तिने लिहून ठेवली असल्याचे मीरा रोड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले.

सेजलने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटचा मजकूर आताच सार्वजनिक करता येणार नाही, असेही संदीप कदम यांनी सांगितले. सेजलच्या कुटुंबियांशी याबाबत चर्चा होणार आहे, तसेच तिने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपुर्वीच अभिनेता कुशल पंजाबीने आत्महत्या केली होती. त्यामुळे चंदेरी दुनियेतील काळी बाजू पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

#spontaneous #musiclovers #dancelovers #bollywoodlove

A post shared by Sejal Sharma (@i_sejalsharmaofficial) on

- Advertisement -

 

- Advertisement -

सेजल शर्मा आपल्या मित्रांसहीत मीरा रोड पुर्व येथील शिवर गार्डन येथे राहत आहे. आज पहाटे तिने आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांना सकाळी ५.३० वाजता फ्लॅटमधील मित्राने मृतदेह पाहिल्यानंतर याबद्दल पोलिसांना माहिती दिली. कदम यांनी सांगितले की, सेजलने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी तिचा मित्र दुसऱ्या खोलीत झोपला होता.

सेजल ही मुळची राजस्थानची आहे. तीन वर्षांपूर्वी तिने घरच्यांशी वाद घालून मुंबईची वाट धरली होती. चंदेरी दुनियेत नशीब आजमवण्यासाठी २०१७ साली ती मुंबईत आली. तिने मॉडलिंग क्षेत्रात काम केले. अभिनेता आमिर खान सोबत ती विवो मोबाइलच्या जाहीरातीत झळकली होती. तर काही वेबसिरीजमध्येही तिने काम केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -