घरमुंबईदेर है....अंधेर नहीं

देर है….अंधेर नहीं

Subscribe

 7 वर्षानंतर प्रवाशाला पैसे परत मिळाले

मुंबईसारख्या गर्दीच्या शहरांत रेल्वे स्थानकात तुमची बॅग किंवा पॉकीट चोरीला गेले तर ते परत मिळण्याची शाश्वती कमीच. कधी कधी पोलीस सुध्दा प्रयत्न करत नाहीत, असा ठपका नेहमीच रेल्वे पोलिसांवर प्रवाशांकडून ठेवला जातो. मात्र, मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी तब्बल 7 वर्षांनंतर एका प्रवाशाचे रेल्वे स्थानकावर 8 हजार रुपये पळविणार्‍या आरोपीला अटक करुन त्याचे पैसे परत केले आहेत. मुंबई सेंट्रल पोलिसांच्या या कामगिरीमुळे प्रवाशी सुशिल कुमार यांनी पोलिसांचे आणि न्यायालयाचे आभार मानले आहेत.

ऑक्टोबर 2013 ला प्रवासी सुशील कुमार यांना मुंबई ते दिल्लीचे रेल्वेे तिकीट काढण्याकरिता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आले होते. तिकीट खिडकीवर गर्दी असल्यामुळे ते रांगेत उभे होते. मात्र या रांगेत एका अनोळखी इसमाने त्यांना झटपट तिकीट काढून देतो,असे सांगत चक्क 8 हजार रुपये तो इसम पसार झाला.याची तक्रार सुशील कुमार यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांना दिली होती. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला. त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात खटला सुरू होता. त्याचा निकाल 7 वर्षांनी लागला. ज्याची रक्कम घेऊन आरोपी पसार झाला होता. त्या प्रवाशाला ते पैसे परत द्यावेत. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सुशील कुमार यांना संपर्क साधत पैसे परत केले,अशी माहिती मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी ‘दैनिक आपलं महानगर’ला दिली.

- Advertisement -

पैसे मिळण्याची आशा सोडली होती                                                                                            ही घटना जेव्हा घडली. तेव्हा मी याची रितसर तक्रार मुंबई लोहमार्ग पोलिसांकडे केली होती. मात्र, काही महिने उलटल्यानंतर मी पैसे मिळेल, याची आशा सुध्दा सोडली होती. मात्र पोलिसांनी मला बुधवारी कॉल केला. तुमचे पैसे मिळाले आहेत. रेल्वे स्थानकात येऊन घेऊन जा. तेव्हा माझा यावर विश्वास बसत नव्हता.मी पोलिसांचे आभार मानतो,असे सुशील कुमार यांनी सांगितले.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -