घरमुंबईएटीएम मशीन बिघडवून पैसे काढणारा चोर सापडला

एटीएम मशीन बिघडवून पैसे काढणारा चोर सापडला

Subscribe

चोर चोरी करण्यासाठी अनेकदा काहीतरी भन्नाट आयडिया करतात. अशा भन्नाट चोऱ्यांवर आधारीत शेकडो चित्रपट येऊन गेलेत. आता चोरांची नवी आयडियाची कल्पना समोर आली आहे. हा चोर एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करुन चोऱ्या करत होता. अंधेरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अशी लढवायचा शक्कल

हा चोर एटीएम मशीनच्या कि बोर्डमध्ये तांत्रिक बिघाड करुन पैसे काढायचा. चोरी करून तो अनेक खातेदारांसह बँकेची फसवणुक करत होता. या प्रकरणी आकाश भोसले या २० वर्षीय चोराला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने २९ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी येथे कोटक महिंद्रा बँकेचे नागरदास रोड आणि अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दोन एटीएम सेंटर आहेत. या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांचे आणि वेगवेगळ्या बँकेच्या बँक ग्राहकांचे एटीएममधून बाहेर पडल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून कमी होत असल्याच्या तक्रारी अंधेरी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद पवार यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेसह सायबर सेलच्या अधिकार्‍यांना तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान या पथकाने संबंधित दोन्ही एटीएम सेंटरची पाहणी केली असता त्यातील की बोर्डमध्ये तांत्रिक स्वरुपाचा बिघाड करुन नंतर विविध खातेदाराच्या खात्यातून पैसे काढले जात असल्याचे उघडकीस आले होते.

- Advertisement -

वाचा – मोलकरणीनेच लुटले १४ लाखांचे हिरेजडीत दागिने

गुन्हा केला कबुल

पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला. त्यामध्ये संबंधित आरोपीविराधत पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम ४१९, ४२० आणि सहकलम ६६ (क), ६६ (ड) आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच मुकूंद पवार यांच्या पथकातील अजीत कानगुडे, अभिजीत पाटील, जगदीश मोरे, राजेश पांडे, सिराज मुजावर यांनी वांद्रे येथील खेरवाडी परिसरातून आकाश भोसले या तरुणाला अटक केली. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. कॉलेज सोडल्यानंतर आकाशने झटपट पैसे कमविण्यासाठी हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने आतापर्यंत दहा व्यवहार करुन ही संबंधित रक्कम काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -