घरमुंबई'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल'; चिमुकल्या वारकऱ्यांचा जयघोष!

‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’; चिमुकल्या वारकऱ्यांचा जयघोष!

Subscribe

आषाढी एकादशीनिमित्त निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव तुकाराम यांच्या जयघोषात अवघी कल्याण-डोंबिवली नगरी दुमदुमून निघाली

‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…’, निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव तुकाराम यांच्या जयघोषात अवघी कल्याण-डोंबिवली नगरी दुमदुमून निघालेली पाहायला मिळाली. ‘आषाढी एकादशी’ निमित्त चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस पडत असूनही चिमुकले वारकरी तल्लीन झाले होते. उद्या, शुक्रवारी आषाढी एकादशी असून पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून निघालेली पालखी आज पंढरपूरात दाखल झाल्या आहेत.

कल्याण – डोंबिवलीत विद्यार्थ्यांची वारी

वारीतून दिला सामाजिक संदेश 

कल्याणमधील बालक मंदिर संस्थेची मराठी आणि इंग्रजी माध्यमेच्या शाळेतील ७०० विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेबरोबरच ‘विठ्ठल-रुख्मिणी’, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, मुक्ताई, संत एकनाथ आदींच्या वेशभूषा केलेले विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तर पंढरपूरप्रमाणे या चिमुकल्या वारकऱ्यांनीही रिंगण, फुगड्या आदी पारंपरिक खेळही खेळण्यात आले. टिळक चौकापासून निघालेली ही दिंडी लालचौकी, पारनाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौकमार्गे शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल मंदिर आणि तिथून पुन्हा शाळेमध्ये परत आणण्यात आली. तसेच डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक शाळेतील इयत्ता ३ री ते ७ वीतील चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. मुख्याध्यापिका बेडसे मॅडम आणि शाळा समितीचे सदस्य रवींद्र जोशी सर यांनीही सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ आणि ‘वृक्ष दिंडी ‘याविषयी विविध घोषणा फलक तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. पर्यावरणाचे रक्षण लोकसंख्येविषयी जनजागृतीचा संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -