घरमुंबईऔरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळेल - रामदास आठवले

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळेल – रामदास आठवले

Subscribe

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबतचे एक भाकीत नुकतेच केले आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडताना स्पष्ट केले आहे की, नामांतराच्या मुद्द्यावरूनच महाविकास आघाडीचे राज्यातले सरकार कोसळेल असे विधान त्यांनी केले आहे. राज्यात लवकरच भारतीय जनता पार्टी आणि रिपल्बिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सरकारची स्थापना करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे घटक असलेल्या कॉंग्रेस आणि शिवसेनेत सध्या औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावर खटके उडत आहेत. शिवसेनेच्या औरंगाबादच्या संभाजी नगर नामकरणाला कॉंग्रेसकडून मोठा विरोध होत असल्याचे चित्र राज्यात दिसले आहे. त्यामुळेच याच मुद्द्यावर हे सरकार पडेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच आगामी काळात भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच आगामी २०२२ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीतही राज्यात भाजप आणि रिपाईच्या माध्यमातून निवडणुक जिंकली जाईल असे संकेत त्यांनी दिले. येत्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये महापौर हा मुंबईचा असेल तर उपमहापौर हा रिपाईचा असेल असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

- Advertisement -

औरंगाबादच्या नामकरणाला विरोधाचा कॉंग्रेसकडून पुर्नउच्चार करण्यात आला. शिवसेना जरी नामांतराच्या भूमिकेवर ठाम असली, तरीही आमचा विरोध कायम राहील पण यामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीत मंत्री असणारे बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर जोरदार विरोध करू अशी भूमिका स्पष्ट केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण नामांतराच्या मुद्द्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये असा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याआधीच बाळासाहेबांनी तीन दशकांपूर्वीच औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचे स्पष्ट केले होते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -