घरमुंबईशिंदेच मुख्यमंत्री व्हावे म्हणून आव्हाडांचे पवारांकडे लॉबिंग!

शिंदेच मुख्यमंत्री व्हावे म्हणून आव्हाडांचे पवारांकडे लॉबिंग!

Subscribe

पडद्यामागे रंगतोय ठाणे प्रयोग

राजकारणात सत्ताकेंद्राचा बिंदू कधी आणि कुठेसरकेल हे कधीचठामपणे सांगता येत नाही.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठीइच्छा असली तरी शरद पवार यांच्या मनात काय आहे? याचा अंदाज करणे कठीण आहे. शिवसेना आणि शरद पवार यांच्यातील समन्वयक असलेल्या संजय राऊत यांच्याही नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु असताना पडद्यामागे एक ठाणे प्रयोग रंगत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले असून शिंदेच्या नावाची जोरदार लॉबिंग तेपवार यांच्याकडेकरत असल्याची खात्रीलायकमाहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे भाजपवजा सरकार महाराष्ट्रात येत आहे आणि यामहाविकास आघाडीचामुख्यमंत्री कोण? याविषयी सर्वत्र एकच चर्चा आहे.उद्धव ठाकरे,संजयराऊतसुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे अशी नावेमुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत असताना दोन ठाणेकरांचे खुलेआममनोमिलन होऊन राज्याच्या इतिहासात प्रथम ठाण्याचा मुख्यमंत्री बनावा यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे.

- Advertisement -

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि लोकप्रतिनिधी पवारांना सोडून जात असताना आव्हाड यांनी आपल्या प्रमुखाची बाजू मोठ्या ताकदीने लावून धरली होती. पवारांचे आधीच ’ब्ल्यू आय बॉय’ असलेले आव्हाड गेल्या सातमहिन्यात अधिक जवळ गेले आहेत आणि त्यांच्या शब्दाला आता पक्षात मोठे वजन आले आहे. विशेष म्हणजे पवार हे आव्हाड यांच्या मताचा नक्कीच विचार करतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. शिंदे हे त्रिपक्षीय सरकारसाठी योग्य असे नाव असून सर्वानासोबत घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आहे. आघाडीचे सरकार चालवण्यासाठी राज्याचा प्रमुखाचा चेहरासहकारी पक्षांसाठी विश्वासाचा लागतो आणि तो विश्वास शिंदे यांच्याकडे असल्याचे आव्हाड यांनी पवार यांना पटवून दिल्याचे सूत्रांकडून समजते.

राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधली जात असताना गुरुवारी ठाण्यात महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले आणि या निमित्तानेपडद्याआडची शिंदे आणि आव्हाड मैत्रीसर्वांसमोर खुली झाली होती. ठाण्याच्या राजकारणात आनंद दिघे आणि वसंत डावखरे याची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली. राजकारणाच्या पलीकडे अशी त्यांची मैत्री होती. यानंतर शिंदे आणि आव्हाड यांच्यातही राजकारणविरहित मैत्रीचे नाते फुललेले आहे. पण, ते खुलेपणाने समोर आले नव्हते. ते आता आले असून या मैत्रीला साक्षी ठेवून आव्हाड यांनी पवार यांच्याकडे शिंदेंसाठी शब्द टाकल्याचे कळते.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस सरकारमध्येही शिंदे हे नाव सहमतीचे होते. शिंदे आणि फडणवीस यांचे संबंध चांगले असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला झाला होता. या सगळ्याची कल्पना असल्याने शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यास त्याचा महाविकास आघाडीला कसा फायदेशीर ठरू शकतो, याचे महत्व आव्हाड यांनी पवारांना समजून दिल्याचे समजते.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव यांची मानसिकता महत्वाची
सध्या मुख्यमंत्री पदाचे एक ठाम नाव जाहीर न करण्याचा निर्णय झाल्याने या घडीलासर्वाना पसंत पडेल असे उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चालवले जात आहे. शरद पवार यांनीही उद्धव यांच्या नावाला सर्वांची पसंती असल्याचे सांगत ’गुगली’ टाकली आहे. ते जे नाव सांगतील ते नाव अंतिम असेल याची काहीच खात्री देता येत नाही.मुख्य म्हणजे उद्धवस्वतः मुख्यमंत्रीपदासाठी किती उत्सुक आहेत आणि त्यांची मानसिकता काय आहे, यावर पुढील घडामोडीअवलंबून राहणार आहेत. यासाठी उद्धव आधी आपल्या सर्व प्रमुख नेत्यांशी बातचीत करूनच पुढचे पाऊल उचलणार आहेत.

शिवसेना आमदारही शिंदेंच्या मागे
निवडून आलेल्या 54 आमदारांपैकी बहुतांशी आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला सहमती दिली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आमदारांची पहिली पसंती असली तरी उद्धव हे प्रमुखपदासाठी उत्सुक नसल्यास लोकप्रतिनिधींमधून सर्वात पुढे नवा हे शिंदे यांचेच असेल, असे समजते.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -