घरमुंबईसीएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी बीएमसीच्या मुख्य अभियंत्यांना अटक

सीएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी बीएमसीच्या मुख्य अभियंत्यांना अटक

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता शीतलप्रसाद कोरी असे अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्याविरोधात आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहेत्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर १० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी त्यांचे पूर्वीच निलंबन करण्यात आले आहे.

यापूर्वी या प्रकरणी सहाय्यक अभियंता एस.एफ.काकुळते यांना अटक केली होती. तसेच नीरजकुमार देसाई यांनाही अटक केली होती. या प्रकरणी आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता त्याच वेळेस वर्तविण्यात आली होती.

- Advertisement -

१४ मार्चला संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान सीएसएमटी जवळचा हिमालय पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. या पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनियरिंग कन्सल्टन्ट आणि अनालिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला.

या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक केली. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सीएसएमटी पूल दुर्घटनाप्रकरणी मुख्य अभियंता एस. . कोरी, . आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर. बी. तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -